DC Vs KKR Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
कॅमरुन ग्रीन अन् मिशेल स्टार्क भिडणार
अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामना
दोन्ही संघांसाठी सामना असणार महत्वाचा
Tata IPL 2026 DC Vs KKR Live Updates: थोड्याच वेळात दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. केकेआरने किंवा दिल्लीने आजचा (KKR Vs DC) सामना जिंकल्यास दोन्ही संघांच्या प्ले ऑफ मध्ये जाण्याच्या अशा पल्लवित राहण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात सामना सुरू होणार आहे. दरम्यान केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या दोन्ही संघ प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आज मैदानात उतरणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर अनुक्रमे पॉईंट्स टेबलमध्ये 6 आणि 7 व्या स्थानावर आहेत. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्पर्धा वाढणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल आणि केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार आणि आपले प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवणार हे पहावे लागणार आहे.
पीच रिपोर्ट काय सांगतो?
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. हे स्टेडियम थोडे लहान असल्याने मोठे फटके मारणे या ठिकाणी सोपे जाते. मात्र या पीचवर स्पिनर्सला देखील मदत मिळू शकते. दिल्लीत आज आकाश निरभ्र असून पावसाची शक्यता केवळ १०% इतकी आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
DC Vs KKR Pitch Report: टॉप 4 मध्ये कोणाला एन्ट्री मिळणार? पहा ‘या’ स्टेडियमचा पीच रिपोर्ट
सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या तर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना सर्व सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक असा होऊ शकतो. आजच्या सामन्यात दोन्ही संघ मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतील. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी काही सामने गमावले. त्यानंतर पुन्हा त्यांनी एक ते दोन सामने जिंकले. केएल राहूलने याच स्टेडियमवर 152 रन्सची नॉट आउट खेळी केली होती.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन.
मीच IPLचा बादशाह! Bhuvneshwar Kumar ने रचला ‘हा’ विक्रम; ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भवअरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर).






