रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी(फोटो- सोशल मिडिया)
Rohit Sharma Test retirement : भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सर्वांना वाटत होते की तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भाग घेईल परंतु या मालिकेपूर्वी त्याने आपली निवृत्ती जाहीर केलीय आहे. पण, आता चाहत्यांना त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा संबंध आढळून आला आहे.
रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधील अद्भुत प्रवासाबद्दल सोशल मीडियावरील चाहते त्याचेअभिनंदन करत व्यक्त होत आहेत. दरम्यान, एक लक्ष वेधून घेणारी मनोरंजक गोष्ट समोर आली आहे, जी जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माचा प्लॅन होता तयार? 2 महीने आधीच कसोटी क्रिकेटला करणार होता अलविदा, वाचा सविस्तर…
खरंतर, एमएस धोनीनेही सोशल मीडियाद्वारेच निवृत्तीची घोषणा केली होती. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने क्रिकेटमधील त्याचा क्रिकेट प्रवास दाखवला होता. कॅप्शनमध्ये असेही लिहिले – ‘तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी १९:२९ वाजता निवृत्त झालो असे समजा. आता, ५ वर्षांनंतर, त्याच वेळी, रोहित शर्माने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती सर्वांना धक्का दिला आहे.
MS Dhoni in 2020 🤝 Rohit Sharma in 2025
Both announced their retirements at 19:29 🇮🇳#RohitSharma | #TestCaptain | #Hitman pic.twitter.com/vLbK6gRjED
— Indian Cricket Team (@incricketteam) May 7, 2025
जेव्हा जेव्हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांबद्दल चर्चा होते, तेव्हा एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांची नावे नक्कीच घेतली जणार आहेत. दोघांच्याही नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक मोठ्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि अनेक मोठ्या कामगिरीही केल्या आहेत. आता दोघांचेही निवृत्ती कनेक्शन समोर आले आहे. माहीने २०२० मध्ये संध्याकाळी ७:२९ वाजता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर ७ मे २०२५ रोजी रोहित शर्माने देखील संध्याकाळी ७:२९ वाजता कसोटीतून निवृत्ती होत असल्याचे जाहीर केले.
रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबाबत बोललो तर त्याने २०१३ मध्ये भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात शर्माने शानदार शतक झळकावून आपल्या कसोटी कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. रोहितने ६७ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १८ अर्धशतके आणि १२ शतके लगावली आहेत. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ८८ षटकार मारले आहेत. हिटमॅन वीरेंद्र सेहवाग (९१ षटकार) नंतर तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे.