भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया कपमध्ये (Asia Cup) सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार सध्या टॉपवर आहे. भूवनेश्वरच्या क्रिकेटसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रंजक किस्से आहेत. मात्र भारताच्या या स्टार गोलंदाजाला एकदा फेसबुक हॅकिंगच्या प्रकरणाला समोर जावं लागलं होत. आश्चर्य म्हणजे भुवनेश्वरचे अकाउंट हॅक करणारी कोणी अनोळखी व्यक्ती नसून स्वतः भुवनेश्वरची पत्नी नुपूर नागरनं (Nupur Nagaran) होती.
भुवनेश्वर कुमार याने क्रिकबझच्या यूट्यूब शोमध्ये आपल्या पत्नीचा उल्लेख करताना त्याच्या सोबत घडलेल्या फेसबुकं हॅकिंगच्या प्रकारची माहिती दिली होती. भुवनेश्वर कुमार म्हणाला होता की,”तिनं मला फेसबुकचा पासवर्ड विचारला, त्यावेळी मी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुसऱ्या दिवशी तिनं माझ्या फेसबूक अकाऊंटचा पासवर्ड काय आहे? तो मला सांगितला. त्यानंतर मला मोठा धक्का बसला. तिनं अक्षरशः माझं खातं हॅक केलं होतं. तेव्हापासून मी फेसबुक वापरलं नाही”, असे भुवनेश्वर कुमार म्हणाला होता. या शोमध्ये नुपूरही होती. “मी भुवनेश्वरला अनेकदा सांगितलं की, महिलांच्या इतक्या जवळून फोटो काढण्याची काय गरज आहे. त्यावेळी तो म्हणतो, त्या जवळ येतात तर, मी काय करू. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर खूप मुली मॅसेज करायच्या. असं नुपूर गमतीत म्हणाली.
भुवनेश्वर आणि त्याची पत्नी नुपूर हे लहानपणीचे मित्र होते आणि दोघांनी २३ नोव्हेंबर २०१७ मध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर भुवनेश्वरची पत्नी नुपूरनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीच्या खाजगी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला.