PM Modi Meet Indian Chess Olympiad Team : बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. भारताच्या पुरुष आणि महिला बुद्धिबळ संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णभरारी घेत इतिहास रचला. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे. आता पंतप्रधान मोदी आणि खेळाडूंच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
VIDEO | PM Modi (@narendramodi) met the Indian team, that won Chess Olympiad, at his residence in New Delhi earlier today.
(Source: Third Party) pic.twitter.com/teTOurjsiI
— Press Trust of India (@PTI_News) September 25, 2024
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेट
या ऐतिहासिक विजयानंतर बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या पुरुष आणि महिला संघांनी आज सकाळी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पीएम मोदी पुरुष आणि महिला संघाच्या खेळाडूंशी चर्चा करतानाही दिसत आहेत.
४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक
भारतीय संघाने ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे 45 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड खेळले गेले, ज्यामध्ये 195 देशांतील 197 पुरुष संघ आणि 181 देशांतील 183 महिला संघ सहभागी झाले होते. पुरुष संघात गुकेश डी, प्रज्ञानंद आर, अर्जुन एरिगाईसी, विदित गुजराथी, पंतला हरिकृष्ण आणि कर्णधार श्रीनाथ नारायणन यांचा समावेश होता.
महिला संघाने असा चमत्कार केला
महिला संघानेही फटकेबाजी करीत सुवर्णपदकावर कब्जा केला. भारतीय महिला संघाने 11व्या फेरीत अझरबैजानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. महिला संघात हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव आणि कर्णधार अभिजीत कुंटे यांचा समावेश होता.
भारतीय पुरुष संघाने 11व्या आणि शेवटच्या फेरीत आश्चर्यकारक कामगिरी केली. पुरुष संघाने 22 पैकी 21 गुण जिंकले. या गुणांमध्ये उझबेकिस्तानविरुद्ध 2-2 अशी बरोबरी देखील समाविष्ट होती. याशिवाय टीम इंडियाने इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.