बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकार जबाबदार? (फोटो-सोशल मिडिया)
Chinnaswamy Stadium Stampede : आरसीबी संघाने १७ वर्षांनंतर पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत ११ जणांचा बळी गेला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या दोन अधिकाऱ्यांनीही राजीनामा देखील दिला आहे. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ४ जून रोजी झालेल्या आपघाताप्रकरणात सरकारला या प्रश्नांची उत्तरे १० जूनपर्यंत उच्च न्यायालयाला सादर करावी लागणार आहेत.
उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला या १० प्रश्नांची सविस्तर उत्तरे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वतःच्या हस्तक्षेप करत दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी केली. यावेळी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती सी.एम. जोशी यांच्या खंडपीठाने सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचा : भारताचा स्फोटक फलंदाज Rinku Singh ची जाणार विकेट! खासदार Priya Saroj सोबत बांधणार लग्नगाठ..
हेही वाचा :‘पुजाराला बाद करण्याबाबत व्हायची चर्चा..’, भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार Rohit Sharma ने केला गमतीदार खुलासा..
या कठीण प्रश्नांमुळे आणि न्यायालयीन चौकशीमुळे, राज्य सरकारने बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वरिष्ठ मंत्री, कायदेशीर सल्लागार ए.एस. पोन्नन्ना आणि महाधिवक्ता के.एम. शशिकिरण शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राजीनामा देत वेळे अधिकारी म्हणाले की, दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित आणि दुःखद घटनांमध्ये आमची भूमिका खूपच मर्यादित भूमिका असू शकते, परंतु याची आम्ही नैतिक जबाबदारी घेत आमच्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच टे पुढे म्हणाले की, आम्ही ६ जून २०२५ रोजी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून सचिव आणि कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.