विहान मल्होत्रा(फोटो-सोशल मीडिया)
Vihaan Malhotra to captain Under-19 ‘A’ team : उदयोन्मुख क्रिकेटपटू विहान मल्होत्राची मंगळवारी आगामी तिरंगी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली, ज्यामध्ये भारत ‘ब’ आणि अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघ देखील सहभागी होतील. हैदराबादचा आरोन जॉर्ज १७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्स येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या १९ वर्षांखालील ‘ब’ संघाचे नेतृत्व करेल.
हेही वाचा : IND vs SA Test series : शुभमन गिलला विश्वविक्रम मोडण्याची संधी! रिकी पॉन्टिंगला टाकणार मागे?
मल्होत्राला कर्णधारपद देण्यात आले आहे तर त्याचे दोन सुपरस्टार सहकारी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे इतर स्पर्धांमध्ये व्यस्त आहेत. यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडू तीन संघांच्या स्पर्धेत ‘अ’ संघाचा उपकर्णधार असेल, तर वेदांत त्रिवेदीला भारताच्या १९ वर्षांखालील ‘ब’ संघासह ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हात्रे सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे, तर सूर्यवंशीची एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी भारताच्या ‘अ’ संघात निवड झाली आहे. हे तीनही युवा खेळाडू भारतीय अंडर-19 संघाच्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्याचा भाग होते.
हेही वाचा : IND vs SA: ‘आम्ही भारताला हरवण्यास उत्सुक…’, केशव महाराजने भारताविरुद्ध फोडली डरकाळी; दिले खुले आव्हान
भारत अंडर-19 अ संघ : विहान मल्होत्रा (कर्णधार), अभिज्ञान कुंडू, वाफी कच्छी, वंश आचार्य, विनीत व्हीके, लक्ष्य रैचंदानी, ए. रापोले, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, अनमोलजीत सिंग, मोहम्मद अनन, हेनिल पटेल, आशुतोष रा महिदा, आदित्य मलिक आणि मलिक.
भारत अंडर-19 ब संघ : आरोन जॉर्ज (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, युवराज गोहिल, मौल्यराज सिंग चावडा, राहुल कुमार, हरवंश सिंग, अन्वय द्रविड, आरएस अम्ब्रिस, बीके किशोर, नमन पुष्पक, हेमचुदेसन जे, उद्धव मोहन, इशान सूद, दीपेश दास, दीपेश आणि रोहित.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील १४ नोव्हेंबर रोजी पहिल्या सामन्याला सुरवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला गेल्या १५ वर्षांपासून भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. दरम्यान दक्षिण आफ्रिकेन संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज केशव महाराज यांनी हा त्यांच्या सर्वात कठीण दौऱ्यांपैकी एक असल्याचे वर्णन केले आहे. तो म्हणाला की, त्यांचा संघ येत्या मालिकेत विजयाची प्रतीक्षा संपवण्यासाठी खरोखरच उत्सुक आहे.






