राज्यात दहावीचे 16 तर बारावीचे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा; शिक्षण मंडळाची तयारी पूर्ण (संग्रहित फोटो)
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तर प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत.
यंदा इयत्ता दहावीसाठी १६ लाख १४ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, बारावीसाठी १५ लाख ३२ हजार र्व ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ मंडळांच्या विभागीय माध्यमातून राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्या जात आहेत. मागील वर्षी प्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान राबवले जात असून, सर्व जिल्ह्यांमध्ये त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
हेदेखील वाचा : महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2026 : दहावी – बारावीचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा
मुंबईतून दहावीचे ३.४९ लाख विद्यार्थी देणार परीक्षा दहावीसाठी एकूण १६ लाख १४ हजार ९९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांची परीक्षा ५११ परीक्षा केंद्रांवर घेतले जाणार आहे. त्यात पुणे विभागातून दोन लाख ७८ हजार ८६, नागपूर विभागातून एक लाख ५३ हजार ९३७, छत्रपती संभाजीनगरमधून एक लाख ९१ हजार ८८५ आहेत.
मुंबई विभागातून तीन लाख विद्यार्थी
मुंबई विभागातून तीन लाख ४९ हजार ६१२, कोल्हापूर विभागातून एक लाख ३२ हजार ७९७, अमरावती विभागातून एक लाख ६५ हजार ३१८, नाशिक विभागातून दोन लाख ६ हजार ५२८, लातूर विभागातून एक लाख ११ हजार ५५, कोकण विभागातून २५ हजार ७६९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.






