• नालासोपारा पूर्वेकडील तांडा पाडा परिसरात शनिवारी सायंकाळी घटना
• 15 वर्षीय अंबिका प्रजापतीची सील-बट्ट्याने हत्या
• मृत मुलीची आई पोलिसांच्या ताब्यात, कारण अद्याप अस्पष्ट
मुंबई: मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या १५ वर्षीय मुलीची खलबत्याने डोकं ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. अंबिका प्रजापती असं या मृत चिमुकलीचे नाव आहे. तर आरोपी आईचे नाव कुमकुम प्रजापती असे आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील विद्या विकास मंडळ चाळ, तांडा पाडा, संतोष भवन परिसरात शनिवारी सायंकाळी घडली.
पत्नीचे अनैतिक संबंध? संशय येताच नवऱ्याने चाकू घेतला अन्…; पुण्यात घडली हृदयद्रावक घटना
कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. त्यांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून पुढील कारवाई चालू आहे. अद्याप या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही आहे. पोलिसांकडून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बदलापुरात पुन्हा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…; नेमकं घडलं काय?
बदलापूर येथील शाळेत पुन्हा एकदा एका चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बदलापूर पश्चिम येथील एका नामांकित शाळेत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेच्या व्हॅन चालकाला अटक केली आहे. दरम्यान, मुलीच्या पालकांनी शाळेत तक्रार केली असता शाळेच्या मुख्याध्यापिकेने बस चालकाची बाजू घेतली. पण शाळेच्या मुख्याध्यापिकेने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत चालकाला अटक केली आहे. अवघ्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला त्यावेळी शाळा प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिक्षण घेते. काल दुपारी नेहमीप्रमाणे ती दुपारी १२.३० वाजता स्कूल व्हॅनमधून घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने व्हॅन चालकाकडे फोनवरून विचारणा केली. साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी परतली. त्यावेळी ती खूप घाबरलेली होती. आईने तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. स्कूल व्हॅनच्या चालकाने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याचे तिने आपल्या आईला सांगितले. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत व्हॅन चालकाला अटक केली आहे.
Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
Ans: नालासोपारा पूर्वेकडील विद्या विकास मंडळ चाळ, तांडा पाडा परिसरात.
Ans: अंबिका प्रजापती, वय 15 वर्षे.
Ans: आईला ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदन व सखोल तपास सुरू आहे.






