मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी उडवला धुव्वा(फोटो-सोशल मीडिया)
UPW vs MI WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या १० वा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा २२ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना यूपीने कर्णधार मेग लॅनिंग आणि फोबी लिचफील्ड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ८ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्स २० षटकात ६ गडी गमावून फक्त १६५ धावाच करू शकला. परिणामी मुंबईला २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशची मुजोरी कायम! भारतीय आयसीसी अधिकाऱ्याला नाकारला व्हिसा
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर यूपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. यूपीची सुरुवात खराब झाली. किरण नवगिरे धाव न घेता माघारी गेली. तथापि, UP कर्णधार मेग लॅनिंग आणि फोबी लिचफिल्ड यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ६१ धावा काढल्यानंतर लिचफिल्ड संघाच्या १२४ धावांवर माघारी गेली.
कर्णधार मेग लॅनिंग देखील ७० धावा करून बाद झाली. तिथून हरलीन देओल आणि क्लोई ट्रायॉनने जलद ४१ धावा जोडत संघाला चनगल्या स्थतीत पोहचवले. हरलीन देओल २५ धावा, तर क्लोई ट्रायॉन २१ धावा काढून बाद झाली. श्वेता सेहरावत खाते न काढता माघारी गेली. सोफी एक्लेस्टोनने १, दीप्ती शर्माने ० आणि आशा शोभानाने १ धाव केली. यूपीने ८ गडी गमावत १८७ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून अमेलिया केरने ३ विकेट घेतल्या, तर नॅट सायव्हर ब्रंटने २ विकेट काढल्या.
प्रत्युत्तरादाखल, यूपीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात देखील चांगली राहिली नाही. सजीवना सजना १० धावा करून माघारी गेली. त्यानंतर, हेली मॅथ्यूज १३ धावा करून २३ धावांवर बाद झाली. संघाच्या ४४ धावांवर नॅट सायव्हर ब्रंट १५ धावा काढून बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौर काही खास करू शकली नाही. ती १८ धावांवर बाद झाली.
हेही वाचा : INDU19 vs BANU19: वैभव सूर्यवंशीचा विश्वचषकात धुराळा! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये मोडला विराट कोहलीचा विक्रम
अमेलिया केर आणि अमनजोत कौर यांनी सहाव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली, परंतु ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. अमनजोत कौर ४१ धावांवर बाद झाली, तर अमेलिया केर ४९ धावांवर नाबाद राहिली. परिणामी, मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १६५ धावा केल्या आणि सामना २२ धावांनी गमावला. यूपीकडून शिखा पांडेने २ विकेट्स घेतल्या तर क्लो ट्रायॉन, सोफी एक्लेस्टोनने आणि क्रांती गौर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन: किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), क्लो ट्रायॉन, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज, गुनालन कमलिनी (डब्ल्यू), अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), अमनजोत कौर, निकोला केरी, सजीवन सजना, संस्कृती गुप्ता, नल्ला क्रांती रेड्डी, त्रिवेणी वसिष्ठ






