
photo- social media
IND Vs AFG; गिल-राहुलची शतकी जुगलबंदी; अफगाणिस्तानविरुद्ध भारताची मजबूत पकड, पहिला डाव 564 वर घोषित
बीसीसीआयने अलीकडेच खेळाडूंना परदेश दौऱ्यांवर आपल्या कुटुंबीयांना सोबत नेण्यास मनाई करणारा नियम लागू केला आहे. मात्र, वृत्तानुसार, बीसीसीआय वैभवच्या बाबतीत सूट देऊ शकते, ज्यामुळे त्याच्या आई-वडिलांना आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवर त्याच्यासोबत जाण्याची परवानगी मिळेल. १९८९ मध्ये, जेव्हा सचिनने वयाच्या १६ व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केले, तेव्हा त्याचा मोठा भाऊ अजित सचिनसोबत पाकिस्तानला गेला होता. आता, बीसीसीआय वैभवच्या आई-वडिलांना आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवर त्याच्यासोबत जाण्याची परवानगी देऊ शकते. एका क्रीडा वेबसाइटशी बोलताना, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, ‘वैभव अजून खूप मोठा नाही, त्यामुळे आम्ही त्याच्या आई-वडिलांना आयर्लंड आणि इंग्लंडला सोबत जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून ते त्याच्यासोबत राहू शकतील आणि त्याला नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करू शकतील. सर्व खर्च बीसीसीआय उचलेल.’
बीसीआयच्या नवीन नियमांनुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यांदरम्यान, खेळाडू संपूर्ण दौऱ्यात आपल्या कुटुंबाला किंवा जोडीदाराला सोबत ठेवू शकत नाहीत. जर एखादी मालिका किंवा स्पर्धा ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ चालली, तर कुटुंबातील सदस्य खेळाडूसोबत केवळ १४ दिवसच राहू शकतात. मात्र, वैभव सूर्यवंशीसाठी बीसीसीआयने हे नियम शिथिल केले असल्याचे सांगितले जात आहे.
वैभव सध्या त्रिकोणीय मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाचा भाग असून श्रीलंका दौऱ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याला मोठा अनुभव मिळावा, यासाठी व्यवस्थापन त्याच्यावर विशेष लक्ष ठेवत आहे. बीसीसीआयचा विश्वास आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाच्या तयारीसाठी त्याच्या पाठीशी त्याचे आई-वडील असणे हा त्याच्यासाठी एक आदर्श आधार ठरेल.
वैभवने IPL 2026 मध्ये शानदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने धडाकेबाज खेळी करत अनेक विक्रम मोडले. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर निवड समितीने त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले. तसेच आगामी आशियाई स्पर्धेसाठीही त्याची निवड करण्यात आली आहे.
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
Men’s U18 Asia Cup: सुवर्णिम कामगिरी! जपानला नमवत ‘भारत अंडर-18 आशिया कपचा’ विजेता