Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बेबी बॉस’च्या उपकर्णधारपदावरून वाद; 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का? टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर

Vaibhav Sooryavanshi Vice Captain east zone Selectors Clarification: २०२६ च्या दुलीप ट्रॉफीसाठी वैभव सूर्यवंशीची पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, इतक्या लहान वयात त्याच्यावर सोपवलेल्या या जबाबदारीमुळे क्रिकेट विश्वात चर्चेला सुरुवात झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 31, 2026 | 01:37 PM
Vaibhav Sooryavanshi Break Sachin Tendulkar record

Vaibhav Sooryavanshi Break Sachin Tendulkar record

Follow Us
Follow Us:
  • ‘बेबी बॉस’च्या उपकर्णधारपदावरून वाद
  • Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का?
  • टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर
भारताचा स्फोटक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. बंगळुरुमध्ये येथे २३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा संघ जाहीर झाला. यावेळी १५ वर्षीय वैभवची पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात वाद निर्माण झाला. क्रीडा तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंच्या एका गटाने या निर्णयावर टीका केली, त्यांच्या मते वैभव सूर्यवंशीला इतक्या लहान वयात उपकर्णधारपद करणे योग्य नव्हते. या टीकेवर आता निवड समितीच्या सदस्याने स्पष्टीकरण दिले आहे.

वो अलग ही लेव्हल का बंदा! ‘बेबी’ बॉसला कोणत्या बॉलरची भीती वाटते? Vaibhav Sooryavanshi म्हणाला…

वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची कमान का?

अवघ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्त केल्यानंतर अनेक स्तरावरुन टीका करण्यात आली. आता या टिकेवर पूर्व विभागाच्या निवड समिती सदस्यांपैकी एक आणि ओडिशाचा माजी रणजी खेळाडू प्रबंजन मलिक यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रबंजन मलिक म्हणाले की, ‘ त्याला कर्णधार म्हणून नव्हे, तर केवळ उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. संघाचा कर्णधार ईशान किशन आहे. ईशान एक यष्टीरक्षक आहे जो दिवसभर मैदानावर सक्रिय असतो आणि खेळाच्या रणनीतीमध्ये सहभागी असतो. वैभव दिवसभर संघाचे नेतृत्व करेल हे पूर्णपणे स्पष्ट नाही. वैभव जसजसा प्रगती करत आहे, तसतसा तो अधिक परिपक्व होत आहे. आम्हाला विश्वास आहे की त्याला अधिक जबाबदारी दिल्याने एक खेळाडू आणि लीडर म्हणून त्याची प्रगती होण्यास मदत होईल.’

मलिक पुढे म्हणाले की, निवड समितीला वैभवमध्ये भविष्यातील भारतीय कर्णधाराची क्षमता दिसते. ते म्हणाले, ‘कोणास ठाऊक? आम्हाला आशा आहे की तो एक दिवस भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार होऊ शकेल. वैभवला उपकर्णधार बनवण्यामागे हीच प्रेरणा होती.’

पूर्व विभागीय निवड समितीच्या मते, वैभवसाठी कर्णधारपद किंवा उपकर्णधारपद नवीन नाही. त्याने यापूर्वीही अशा भूमिका यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. मलिक यांनी आठवण करून दिली की, वैभव त्याच्या घरच्या संघ, बिहारसाठी प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये उपकर्णधार आहे. इतकेच नाही, तर २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्याने भारतीय संघात उपकर्णधारपदाची भूमिका निभावली आहे.

निवडीपूर्वी कोणतीही चर्चा झाली नाही

निवड समितीने वैभवला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यापूर्वी त्याच्याशी चर्चा केली होती का, हे उघड करताना प्रभंजन मलिक म्हणाले की, ‘ नाही, त्याच्याशी आधी कोणतीही चर्चा झाली नव्हती. हा पूर्व विभागातील सर्व राज्यांच्या निवड समितीने घेतलेला सामूहिक निर्णय होता. आम्हाला खात्री आहे की वैभवमध्ये जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे आणि गरज पडेल तेव्हा संघाचे नेतृत्व करण्यास तो पूर्णपणे सक्षम आहे.’

वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवरून रंगला वाद; माजी कर्णधाराचा संताप, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Vaibhav sooryavanshi vice captain duleep trophy east zone selectors clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • bcci
  • bihar
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
1

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय
2

Rishabh Pant: 4 वर्षांत 6 रन्स केल्यावर जागा कशी मिळणार? वेस्ट इंडिजविरुद्ध पंतला BCCI ने केले बाय-बाय

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी
3

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?
4

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.