वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi’s New Year’s plan : २०२५ मध्ये बिहारच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वैभवचे नाव या वर्षी चांगलेच चर्चेत राहिले आहे. दरम्यान, अनेक जण आता २०२६ या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच आता प्रश्न पडला आहे की, वैभव सूर्यवंशी त्याचे नवीन वर्ष कुठे साजरे करणार आहे. वैभव सूर्यवंशीची अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय अंडर-१९ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या अंडर-१९ विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात देखील निवड करण्यात आली.
हेही वाचा : Abhishek Sharma : बापरे ठोकले 45 षटकार! पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माचे वादळी सराव सत्र
वैभव सूर्यवंशी नवीन वर्षाच्या दिवशी घरगुती सामना खेळताना दिसणार नाही, त्याऐवजी तो भारतापासून ७,३०० किलोमीटर अंतरावर तो खास क्षण साजरा करताना दिसणार आहे. आता, वैभव सूर्यवंशी दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी शहरात नव वर्ष साजरे करणार आहे.
भारताचा १९ वर्षांखालील संघ ३ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना ३ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे, त्यानंतर दुसरा सामना ५ जानेवारी रोजी आणि तिसरा आणि शेवटचा सामना ७ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने बेनोनी शहरात खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघ ३० डिसेंबर रोजी रवाना होणार आहे.
आता भारताचा १९ वर्षांखालील संघ ३० डिसेंबर रोजी बेनोनीला रवाना होणार आहे. त्यामुळे आता वैभव सूर्यवंशी बेनोनी शहरात नवीन वर्ष साजरे करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी शहर वैभव सूर्यवंशीसाठी दोन कारणांमुळे खास असणार आहे. त्यातील एक म्हणजे तो २०२६ सालाचे स्वागत करून तेथे नवीन वर्ष साजरे करताना दिसणार आहे. तसेच, तो त्याच शहरात पहिल्यांदाच १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व देखील करणार आहे.
हेही वाचा : VHT 2025-26: वैभव सूर्यवंशी काही थांबेना! मेघालय विरुद्ध फक्त 10 चेंडूत फटकावल्या 31 धावा
कर्णधार आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वैभव सूर्यवंशीकडे १९ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद आले. बेनोनीमध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या समाप्तीनंतर, भारताचा १९ वर्षांखालील संघ तिथून झिम्बाब्वे आणि नामिबियाला रवाना होणार आहे. जिथे १५ जानेवारीपासून १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.






