
Sportsfield Monsoon League
सातारा रोड येथील टेंभेकर फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत फॅन्टम क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना २४.२ षटकांत ९७ धावा केल्या. सॅव्हिओ राफायलने नाबाद २२ धावांची सर्वाधिक खेळी केली. विजय क्रिकेट ॲकॅडमीच्या कौशल गायकवाडने अचूक गोलंदाजी करत तीन धावांत दोन गडी बाद केले. मानव सोळंकीने १९ धावांत दोन गडी बाद करत त्याला साथ दिली.
विजयासाठी आवश्यक ९८ धावांचे लक्ष्य विजय क्रिकेट ॲकॅडमीने १६.४ षटकांत दोन गडी गमावून सहज गाठले. ऋषीकेश लोंढेने २२ धावांची खेळी केली. आर्यन सिंगने नाबाद २६, तर सचिन बोराने नाबाद १५ धावा करत संघाचा विजय सुकर केला. या विजयासह विजय क्रिकेट ॲकॅडमीने स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदविला.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात वेदांत जामच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनने अष्टपैलू स्पोर्ट्स संघाचा केवळ तीन धावांनी पराभव केला. इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनने प्रथम फलंदाजी करताना १८० धावांचे आव्हान उभे केले. प्रथमेश पाटोळेने आक्रमक फलंदाजी करताना ४० चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. रेयान पावसकरने २६, तर कोविड पराशरने २० धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या वाढविण्यात हातभार लावला.
DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच
१८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अष्टपैलू स्पोर्ट्स संघाचा डाव अखेरच्या षटकात १७७ धावांवर संपुष्टात आला. सिध्दांत सिंगने ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७४ धावांची झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, इकोलच्या गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात अचूक मारा करत सामना आपल्या बाजूने झुकविला.वेदांत जामने ३२ धावांत तीन गडी बाद करत प्रभावी कामगिरी केली. शक्य पाटणकरने दोन गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली. अखेर इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनने तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेतील सलग पाचव्या विजयाची नोंद केली.