Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs RCB : ‘त्या’ दोन बाऊन्सरवर दोन दिग्गजांचा संताप, खेचले षटकारानंतर षटकार, केली गोलंदाजांची धुलाई.. 

चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या दरम्यान गोलंदाज यानी फलंदाज यांच्यातील युद्ध बघायला मिळाले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 29, 2025 | 11:41 AM
CSK vs RCB: Two legends angry at 'those' two bouncers, hit six after six, washed away the bowlers..

CSK vs RCB: Two legends angry at 'those' two bouncers, hit six after six, washed away the bowlers..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 हंगाम चांगलाच रंगात आला आहे.  अशातच 8 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत सीएसकेसमोर 197 धावांचे आव्हान ठेवेल होते.  प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग संघ धावांचा पाठलाग करत असताना 146 धावांपर्यंतच मजल मारू शकला. याचा परिणाम सीएसकेला सामना गमवावा लागला. मात्र या सामन्यात दोन घटना अशा घडला की दोन दिग्गजांचा संताप बघायला मिळाला.

विराट कोहलीचे पाथिरानाच्या बाऊन्सरला चोख उत्तर..

आरसीबी संघाची फलंदाजी सुरू असताना मैदनात विराट कोहली खेळत होता. समोर मथिशा पाथिराना गोलंदाजी करत होता. विराट कोहली पाथिरानाच्या बाऊन्सरवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तेवढ्यात चेंडू  बॅटला आदळल्यानंतर त्याच्या हेल्मेटच्या ग्रिलला जाऊन  लागला, त्यामुळे स्टेडियममधील चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. मात्र, विराट कोहलीने थोडा वेळ घेतला आणि नंतर पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो सज्ज झाला. पाथीरानाने पुन्हा विराटला बाऊन्सर टाकला, त्यावर विराट कोहलीने फाइन लेगच्या दिशेने खणखणीत षटकार लगावला. षटकार मारल्यानंतर विराट कोहली पाथीरानासोबत काहीतरी कुजबूज करताना दिसून आला.  कोहली 30 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार लगावला आहे. त्याला नूर अहमदने माघारी धाडले.

हेही वाचा : IPL 2025 : CSK चा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी; धोनीमुळे हा दिवस आला..! सोशल मीडियावर राडा..

कृणालच्या डीचवण्याला धोनीचे बॅटने उत्तर..

आयपीएल 2025 मधील 8 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात अल. या सामन्यात आरसीबीने सीएसकेचा दारुण पराभव केला. या सामन्यात आरसीबी संघाने 50 धावांच्या मोठ्या फरकाने चेन्नईचा धुव्वा उडवला. या विजयासह आरसीबीने तब्बल 17 वर्षांनंतर सीएसकेचा त्यांच्याच घरात पराभव करून दाखवला.  या सामन्यात एमएस धोनीची स्फोटक खेळी बघायला मिळाली, मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. खर तर तो 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, त्यावेळी सामाना सीएसकेच्या हातातून निघून गेला होता. या दरम्यान धोनीचा सामना कृणाल पंड्याशीही झाला. त्यावेळी धोनीचा आक्रमक अंदाज बघायला मिळला.

कृणाल पंड्याचा बाऊन्सर अन् धोनीचा षटकार..

चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 16 व्या षटकात एम एस धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला होता. यानंतर त्याने काही छोटे  मोठे फटके मारले आणि तो नाबाद राहून तंबूत परतला. यादरम्यान आरसीबीकडून कृणाल पांड्याने सामन्यातील शेवटचे षटक टाकले. तेव्हा धोनी स्ट्राइकवर होता. क्रुणालने पहिला चेंडू डॉट टाकला. यानंतर त्याने दुसरा चेंडू जवळपास बाऊन्सरच टाकला, जे बघून सर्वच अवाक झाले. धोनीही या चेंडूने हैराण झाला, कारण फिरकीपटूकडून बाऊन्सर चेंडू येणे अपेक्षित नसते.

हेही वाचा : RCB vs CSK : 17 वर्षांनंतर कोण ठरला CSK च्या पराभवाचा खलनायक? ऋतुराज गायकवाडने मांडली सारीच व्यथा..

यानंतर धोनीने देखील क्रुणाल पांड्याला चोख प्रत्युत्तर दिले. पुढच्याच चेंडूवर त्याने पांड्याला लांबलचक षटकार लगावला. धोनी यावरच थांबला नाही आणि त्याने ओव्हरचा चौथा चेंडू देखील सीमापार टोलवला आणि 2 चेंडूत 12 धावा चोपल्या. यानंतर धोनीने या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर देखील चौकार ठोकून सामन्याचा शेवट केला. या सामन्यात धोनीने 16 चेंडूत 30 धावा केल्या. मात्र त्याला संघाला विजयी करता आले नाही आणि आरसीबीने चेन्नईला पराभूत केले.

 

Web Title: Virat kohli and dhonis anger over bouncer csk vs rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • krunal pandya
  • Matheesha Pathirana
  • MS Dhoni Captain
  • virat kohali

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
2

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
3

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
4

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.