ऋतुराज गायकवाड(फोटो-सोशल मीडिया)
RCB vs CSK : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आयपीएल 2025 मधील 8 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये (दि. 28 मार्च) पडला. हा सामना चेपॉक स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला बंगळुरूने 50 धावांनी पराभवाची धूळ चारली. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला आहे. याआधी म्हणजे 2008 मध्ये आरसीबीने सीएसकेचा पराभव केला होता. या पराभवाबाबत सीएसकेचा कर्णधार व्यक्त झाला आहे.
चेपॉकमधील आयपीएल सामन्यातमध्ये सतरा वर्षांनंतर झालेल्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाडची वेदना बाहेर आली. आरसीबीकडून चेन्नई सुपर किंग्जला पराभव स्वीकारावा लागला. तर सीएसकेच्या कर्णधाराने या सामन्यात आपल्या संघाला पराभवाचा सामना का करावा लागला? याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आरसीबीच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदारने अर्धशतक लगावत संघाला 196 धावांपर्यंत पोहचवले. तर चेन्नईला 146 धावांपर्यंतच मजल मारता आली.
हेही वाचा : IPL 2025 : CSK विरुद्ध Virat Kohli च ‘किंग’, शिखर धवनचा विक्रम मोडत रचल ‘हा’ इतिहास
चेन्नईला 2008 नंतर आरसीबीकडून त्यांच्या घरच्या मैदानावर पहिला पराभव करण्यात आला. या पराभवानंतर रुतुराज गायकवाड म्हणाला की, मला अजूनही वाटते की या मैदानावर 170 धावांची धावसंख्या योग्य होती. येथे फलंदाजी करणे अवघड होते. खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्ही आमचा सामना गमावला आहे. तो पुढे म्हणाला की, जर तुम्ही 170 धावांचा पाठलाग करत असता तर तुम्हाला आणखी काही वेळ मिळू शकला असता.असे गायकवाड म्हणाला.
पॉवरप्लेमध्ये 20 जादा धावा करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने खेळण्याची गरज होती. जिथे आम्ही खेळू शकलो नाही. सीएसकेचा कर्णधार म्हणाला की, आम्ही अनेक झेल सोडले आणि त्यांचे फलंदाज चौकार आणि षटकार मारत राहिले. शेवटच्या षटकापर्यंत त्यांचा वेग काही कमी झाला नाही. आम्हाला वाटतं की आम्हाला क्षेत्ररक्षणावर खूप मेहनत करण्याची गरज आहे.
हेही वाचा : IPL 2025 : MS Dhoni ने CSK साठी केला भीम पराक्रम, आपल्याच खास मित्राचा विक्रम मोडला
आरसीबीकडून 51 धावांची खेळी करणारा कर्णधार रजत पाटीदार सामनावीर म्हणून गौरवीला गेला. पाटीदार म्हणाला की, या मैदानावर ही चांगली धावसंख्या होती, कारण येथे चौकार आणि षटकार मारणे सोपे नव्हते. चेपॉकमधील 17 वर्षांनंतरच्या विजयाबद्दल तो म्हणाला की येथे जिंकणे नेहमीच खास असते. कारण, चेन्नईचे चाहते त्यांच्या संघाला वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करत असतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये काल म्हणजेच 28 मार्चला चेपॉक स्टेडियमवर सामना रंगला होता. यावेळी आरसीबीने चेन्नई सुपर किंग्ससमोर 196 धावांचे आव्हान देण्यात आले होते. परंतु, चेन्नईचा संघ 20 षटकात केवळ 146 धावा करू शकला आणि या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाचा बंगळुरूने 50 धावांनी पराभव केला. या विजयाने आरसीबीने तब्बल 18 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपुष्टात आला.