रॅपर ड्रेक आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना मंगळवार, ३ जून रोजी खेळवला जाता आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजे ३ जून रोजी खेळवला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ फलंदाजी करत आहे. आरसीबी हा सामना जिंकून पहिल्यांदा आयपीएल टायटल . त्याच वेळी, पंजाब किंग्ज त्यांच्या नवीन कर्णधारासह नवीन इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे.
अंतिम सामन्यात सर्वांचे लक्ष आरसीबीच्या स्टार फलंदाज विराट कोहलीवर टिकून आहे. विराट कोहलीने चालु हंगामात संघासाठी अनेक महत्त्वाचे सामने खेळले आहेत. त्याने चालू हंगामात एकूण ६१४ धावा काढल्या आहेत. दरम्यान, एका परदेशी स्टारने विराट कोहलीच्या संघावर मोठा सट्टा लावला आहे.
हेही वाचा : IPL 2025 RCB vs PBKS Final: “… स्पर्धेची पुनरावृत्ती होणार”; श्रेयस अय्यरने फायनलआधी रजत पाटीदारला डिवचलं
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याचे वेड केवळ भारतीयांनाच नाही तर परदेशात देखील दिसून येत आहे. यादरम्यान हॉलिवूडचा लोकप्रिय रॅपर ड्रेकने विराट कोहलीच्या संघावर मोठी पैज लावली आहे. त्याने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये त्याने आरसीबीला पाठिंबा देत ७५०,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी ४३ लाख रुपयांची पैज लावली आहे.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, ड्रेकने ‘किकी डू यू लव्ह मी’ या गाण्याने जगभरात स्वतःची छाप पडली आहे. जगभरातून त्याचे मोठे फॉलोअर करतात. आता त्याला आयपीएलचे व्यसन देखील लागलेले दिसत आहे. याआधी देखील ड्रेकने अनेक मोठ्या स्पर्धांवर पैज लावलेली आहे. रॅपर ड्रेकने यापूर्वीही हाय प्रोफाइल खेळाडू आणि संघांवर मोठी पैजा लावलेल्या आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिल साल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड.
पंजाब किंग्ज: प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वधेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, अझमतुल्ला उमरझाई, काइल जेमीसन, विजयकुमार विशाख, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.