विराट कोहली-शुभमन गिल : काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल लढत पाहायला मिळाली. कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा 9 विकेट्सने पराभव केला. कालच्या सामन्यांमध्ये विराट कोहली दमदार खेळी खेळून आरसीबीला विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, कोहलीने 44 चेंडूत 70* धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाला 9 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यांमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहली आणि गिल भांडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, फलंदाजी करताना विराट कोहली क्षेत्ररक्षण करत असलेल्या शुभमन गिलच्या जवळ येतो आणि त्याच्या खांद्यावर आपटतो. गिलसोबत कोहलीची ही फनी स्टाइल होती. कोहली आणि गिल यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. अनेकदा कोहली गिलसोबत मस्ती करताना दिसला. याला तुम्ही कोहली आणि गिलचा ब्रोमान्स म्हणू शकता.
Virat Kohli loves to tease Shubman Gill?♥️pic.twitter.com/BPfCS1FCcs
— SHREYA.♥️ (@Here4VK18) April 28, 2024
RCB आणि गुजरात टायटन्स यांच्यातील IPL 2024 चा 45 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकात 200/3 धावा केल्या होत्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 16 षटकांत केवळ 1 गडी गमावून विजयाची नोंद केली.