ऑरेंज कप आणि पर्पल कप होल्डर्स : इंडियन प्रीमियर लीग 2024चा (Indian Premier League 2024) हा सिझन शेवटच्या टप्प्यात आहे. कालच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून कोलकाता नाईट राइडर्सने (Kolkata Knight Riders) प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. कालच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणले होते. परंतु कालचा हा सामान 16 षटकांचा खेळवण्यात आला. कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स कोलकाताने या हंगामात दुसऱ्यांदा पराभव केला. आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये जो फलंदाज सर्वाधिक धावा करतो त्या खेळाडूला ऑरेंज कप दिली जाते तर जो गोलंदाज सर्वाधिक विकेट्स घेतलो त्याला पर्पल कप दिली जाते. जाणून घेऊया कोणते खेळाडू या शर्यतीत कायम.
[read_also content=”KKR प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ, या हंगामात मुंबई इंडियन्सचा केला दुसऱ्यांदा पराभव https://www.navarashtra.com/sports/kkr-became-the-first-team-to-qualify-for-the-playoffs-losing-to-mumbai-indians-for-the-second-time-this-season-532410.html”]
सर्वाधिक धावा करणारे पहिले 5 फलंदाज
आयपीएल 2024च्या या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा अव्वल स्थानावर आहे. विराट कोहली 12 सामन्यांमध्ये 634 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आहे. ऋतुराजने आतापर्यत 12 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने 541 धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड (Travis Head) तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 11 सामन्यांमध्ये 533 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शनने (Sai Sudarshan) आतापर्यत 12 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने 527 धावा केल्या आहेत. साई सुदर्शन या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. संजू सॅमसनने (Sanju Samson) आतापर्यत 11 सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने 471 धावा केल्या आहेत. या शर्यतीत सध्या ऑरेंज कप विराट कोहलीकडे आहे.
[read_also content=”जोस बटलर सुद्धा आहे माहीचा फॅन, व्हिडिओ व्हायरल https://www.navarashtra.com/sports/jos-buttler-is-also-a-fan-of-mahi-video-goes-viral-532394.html”]
सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप ५ खेळाडू
इंडियन प्रीमियर लीग 2024च्या या सीझनमध्ये गोलंदाजानी उत्कृष्ट खेळ दाखवला. पर्पल कपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आहे. यंदाच्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी फार काही चांगली नव्हती परंतु बुमराहने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यत 20 विकेट्स घेतले आहेत. या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर हर्षल पटेल (Harshit Patel) आहे त्याने आतापर्यत 20 विकेट्स मिळवले आहेत. वरुण चक्रवर्ती (Varun Chakraborty) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने 18 विकेट्स आतापर्यत मिळवले आहेत. हर्षित राणा (Harshit Rana) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 16 विकेट्स घेतले आहेत.