वसीम अक्रम(फोटो-सोशल मीडिया)
Wasim Akram’s world record : क्रिकेट इतिहासात असे अनेक विक्रम होऊन गेले आहेत, की त्यांना मोडणे अशक्य मानले जात आले आहेत. जर आपण उदाहरणा दाखल सांगायचे झाले तर श्रीलंकेचा महान फ्रिकीपटू मुथय्या मुरलीधरनचे कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी टिपले आहेत. त्याचा हा एक विश्वविक्रम आहे. हा विक्रम मोडणे अशक्यप्राय मानला जातो. पण आपण पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रमचा असाच एक विश्वविक्रम आहे, ज्याला भविष्यात मोडणे अशक्य वाटत आहे. परंतु, भविष्यात जर कुण्या गोलंदाजाने विश्वविक्रम मोडीत काढला तर मात्र त्या गोलंदाजाचे नाव क्रिकेट इतिहासात कायमचे अमर होऊ शकते.
पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने त्याच्या दीर्घ गौरवशाली कारकिर्दीमधील लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ८८१ बळी टिपले आहेत. हा आकडा एक विश्वविक्रम आहे. कारण आजपर्यंत इतर कोणताही गोलंदाज ७०० बळींचा टप्पा गाठू शकलेला नाही. हा विक्रम साध्य करण्यासाठी केवळ दीर्घ कारकिर्दीच नव्हे तर तंदुरुस्तीसह कामगिरीतील सातत्य देखील आवश्यक असणार आहे.
लिस्ट एची आकडेवारीकडे बघता सध्या तरी हे स्पष्टपणे दिसते की, वसिम अक्रमचा हा विक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे. पाकिस्तानच्या या दिग्गज अक्रमला ‘स्विंगचा सुलतान’ म्हणून ओळखले जाते. नवीन चेंडूने त्याचे इनस्विंग-आउटस्विंग आणि जुन्या चेंडूने रिव्हर्स स्विंग फलंदाजांना गोंधळात टाकणारे असायचे. यामुळेच वसिम अक्रमला क्रिकेट इतिहासातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाते.
वसिम अक्रमने त्याच्या कारकिर्दीत ५९४ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ३४ वेळा ४ बळी आणि १२ वेळा ५ बळी टिपण्याची किमया साधली आहे. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ३.८९ इतका होता. इतका वेळ तंदुरुस्त राहून खेळात सातत्य दाखवत वेगवान गोलंदाजाने अशी कामगिरी करणे दुर्मिळ असे मानले जात आहे. वसीम अक्रम केवळ देशांतर्गत क्रिकेटपुरता मर्यादित नसून त्याने पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९१६ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. तो पाकिस्तानचा क्रमांक १ चा गोलंदाज आहे.
हेही वाचा : ‘एकदिवसीय क्रिकेट थांबवा, ऑलिंपिकवर लक्ष द्या…’, ललित मोदींचा ICC ला अजब सल्ला; पहा VIDEO
वसिम अक्रमने १९८५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले होते. अक्रमने त्याच वर्षी १८ वर्षे २१५ दिवसांच्या वयात कसोटी सामन्यात १० बळी घेण्याचा भीम पराक्रम केला होता. नंतर बांगलादेशच्या अनामुल हक ज्युनियरने हा विक्रम मोडीत काढला होता.