टिनो बेस्ट(फोटो-सोशल मीडिया)
West Indies Cricket : क्रिकेट जगतात प्रेम प्रकरणे हा विषय नवीन नाही. अनेक क्रिकेटपटूंची प्रे प्रकरण चांगलीच गाजली आहेत. परंतु, वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज टिनो बेस्ट सद्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. टिनो बेस्टने त्याच्या आत्मचरित्राटे अनेक खुलसे केले आहेत. त्यातील एका खुलशाने क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. टिनो बेस्टने त्याच्या ‘माइंड द विंडोज-माय स्टोरी’ या आत्मचरित्रात त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि खाजगी आयुष्याबद्दल बरीच माहिती सांगितली आहे.
वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज टिनो बेस्टने त्याच्या आत्मचरित्राच्या पुस्तकात लिहिले आहे की, माझे पहिले प्रेम मेलिसा नावाच्या तरुणीवर होते. पण नंतर तिच्याशी चांगले संबंध राहू शकले नाही आणि आम्ही दोघेही वेगळे झालो. मेलिसापासून वेगळे झाल्यानंतर टिनो बेस्टने स्वतःला प्लेबॉय बनवून घेतल्याची माहिती मिळते. टिनो बेस्टने पुस्तकात असा देखील उल्लेख केला आहे की, त्याचे ६०० हून अधिक महिलांसोबत शारीरिक संबंध राहिले आहेत. म्हणूनच तो स्वतःला ‘ब्लॅक ब्रॅड पिट’ असे देखील म्हणत असे. टिनो बेस्टने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे की, त्याने स्वतःला प्लेबॉय जरी बनवले असले तरी त्याचा त्याच्या कारकिर्दीवर काही देखील परिणाम होऊ दिला नाही. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी खूप मेहनत करत होता, असे देखील त्याने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : WTC Final 2025 : स्टीव्ह स्मिथ एक्सप्रेस सुसाट! लॉर्ड्सवर ४० धावा काढताच डॉन ब्रॅडमनचा विक्रम खलसा..
वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाजाने त्याच्या पुस्तकात असा देखील खुलासा केला आहे की, ऑस्ट्रेलियन महिला त्याला सर्वांत जास्त आवडत असून ऑस्ट्रेलियन महिला सर्वात जास्त सुंदर असतात. त्याने जगभरातील महिलांसोबत शारीरिक संबंध तहवले असले तरी त्याला ऑस्ट्रेलियन महिला सर्वात सुंदर वाटत आल्या आहेत. जगातील सर्वात सुंदर मुली ऑस्ट्रेलियाच्या असल्याचा त्याने दावा केला आहे. त्याच्या मते त्या अद्भुत आहेत आणि फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देतात, असं टिनो बेस्टने आपल्या पसुटकात लिहिले आहे.
हेही वाचा : IND VS ENG : ‘त्याला कोणत्याही परिस्थितीत..’, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत Shreyas Iyer ला डावलल्याने ‘दादा’ खेळाडू संतापला..
टिनो बेस्ट वेस्ट इंडिज संघासाठी २००३ ते २०१४ या काळात खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने २५ सामन्यांत ५७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी ६/४० अशी राहिली आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी बघितली तर २६ सामने खेळून त्याने ३४ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची ४/३५ सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याने ६ टी-२० सामने खेळले आहेत.