डॉन ब्रॅडमन आणि स्टीव्ह स्मिथ(फोटो-सोशल मीडिया)
WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाची सुरवात फारसी चांगली झाली नाही. साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज कसिगो रबाडाने ऑस्ट्रेलियाला सुरवातीला उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांच्या रूपात धक्के दिले. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी स्टीव्ह स्मिथ आला आणि त्याने ४० धावा पूर्ण करताच इतिहास रचला आहे.
कागिसो रबाडा आणि मार्को जानसेन यांनी दक्षिण आफ्रिकेला मोठे यश मिळवून दिले आहे. या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. १०० धावांच्या आत ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स गामावल्या. परंतु, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपली विकेट्स वाचवत खेळत आहे. या दरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने मागील तीन सामन्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध लागोपाठ तीन अर्धशतके लागावळी आहेत. या महामुकाबल्यात स्टीव्ह स्मिथने ४० धावा काढताच डॉन ब्रॅडमनचा विक्रम देखील मोडीत काढला. त्याने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानाच्या संदर्भात डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
हेही वाचा : WTC Final 2025 : Steve Smith मैदानावर उतरताच रचला इतिहास! ‘या’ विक्रमाशी साधली बरोबरी…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना लंडनमधील ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर खेळवण्यात येत आहे. यादरम्यान, त्याने डॉन ब्रॅडमनचा एक खास विक्रम देखील मोडलाया आहे. खरंतर, डॉन ब्रॅडमनने लॉर्ड्सच्या मैदानावर एकूण ५५१ धावा केलेल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये स्टीव्ह स्मिथने या मैदानावर ४० धावा काढताच ब्रॅडमनचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी स्टीव्ह स्मिथने लॉर्ड्सवर एकूण ५१२ धावा काढल्या होत्या. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जेतेपदाच्या सामन्यात त्याने ४० धावा काढताच डॉन ब्रॅडमनचा ५५१ धावांचा टप्पा पार केला आहे. यानुसार, आता स्टीव्ह स्मिथ हा लॉर्ड्सवर डॉन ब्रॅडमनपेक्षा जास्त धावा काढणारा फलंदाज बनला आहे.
कागिसो रबाडा आणि मार्को जानसेन यांनी दक्षिण आफ्रिकेला मोठे यश मिळवून दिले आहे. कगीसो रबाडाने प्रथम उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजा भोपळाही न फोडता आऊट झाला.त्याने २० चेंडूचा सामना केला. त्यात त्याला एक ही धाव काढता आली नाही. तर त्याच षटकात रबडाने कॅमेरॉन ग्रीनला ४ धावांवर असताना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांनंतर मार्नस लाबुशेन(५६ चेंडू १७ धावा) आणि ट्रॅव्हिस हेड(१३ चेंडू ११ धावा) या जोडीला मार्को जानसेने आऊट केले. सध्या स्टीव्ह स्मिथ ५५ धावांवर तर ब्यू वेबस्टर १७ धावांवर खेळत आहे. ३६ ओव्हर झाले असून ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद ११६ धावा झाल्या आहेत.