भारत विरुद्ध आयर्लंड (फोटो- सोशल मीडिया)
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात शेवटचा सामना टी 20 सामना 5 जून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळला होता. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता. तेव्हा रोहित शर्मा अन् विराट कोहली देखील संघाचा समावेश होता. तया सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आयर्लंडला 100 रन्सच्या आत रोखले होते.
आयर्लंडचा संघ 16 ओव्हरमध्ये 96 रन्सकरून ऑल आउट झाला होता. यावेळेस हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. तर जसप्रीत बूमराहला 2 विकेट्स मिळाल्या. तर भारतीय संघाने हे आव्हान 12 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पूर्ण केले होते. या सामन्यात विराट कोहली केवळ 5 रन्स करून आउट झाला होता. तर रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. भारतीय संघांने शानदार विजय मिळवला होता.






