फोटो सौजन्य - सुमित नागाला X अकाउंट
सुमित नागल : भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागल (Sumit Nagal) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागील आठवड्यामध्ये त्याने जर्मनीतील हेलब्रॉन चॅलेंजरचा (Heilbronn Neckarcup Challenger) मान मिळवला आहे. तर या आठवड्यामध्ये त्याने पेरुगिया चॅलेंजरच्या (Perugia Challenger) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सुमित नागलने एकही सामना न गमावता सलग ९ विजय मिळवले आहेत. कालच्या सामन्यांमध्ये त्याने माजी जागतिक क्रमवारीत ३७व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या बर्नाबे झापाटा मिरॅलेसचा ७-६ (७-२) १-६, ६-२ असा पराभव करत पेरुगिया चॅलेंजरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता त्याची नजर या वर्षातील तिसऱ्या विजेतेपदावर आहे.
कधी आणि कोणाशी होणार सुमित नागलचा सामना?
आज म्हणजेच १६ जून रोजी रात्री १० वाजता सुरु होणार आहे. सुमित नागलचा सामना इटालियन टेनिस प्लेयर लुसियानो डार्डेरी होणार आहे. आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यावर नागलचे या महिन्यातील दुसरे टायटल असणार आहे. लुसियानो डार्डेरी सध्या जागतिक क्रमवारीमध्ये सध्या ४० नंबर आहे. तर सुमित नागल जागतिक क्रमवारीमध्ये ७७ क्रमांकावर आहे.
नागलचा सेमीफायनल सामन्याचा अहवाल
जागतिक क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च ७७व्या क्रमांकावर असलेल्या २६ वर्षीय नागलला पहिल्या सेटमध्ये खडतर आव्हानाचा सामना करावा लागला पण टायब्रेकरमध्ये त्याने स्पॅनियार्डवर मात केली. मिरालेसने दुसरा सेट ६-१ असा जिंकून वर्चस्व गाजवले आणि पहिल्या सर्व्हिसपैकी ७७ टक्के जिंकले. पण भारतीय खेळाडूने निर्णायक सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि तीन एक्स्चेंजमध्ये स्पॅनियार्डवर पहिला विजय नोंदवला. नागलने सातत्यपूर्ण टेनिस खेळला आणि जर्मनीतील हेलब्रॉन चॅलेंजरमध्ये पदार्पण केल्यापासून सलग नवव्या विजयाचा दावा केला, जो त्याने या महिन्याच्या सुरुवातीला जिंकला. अशाप्रकारे, नागल चॅलेंजर विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहे, ज्यामुळे त्याला टॉप-50 मध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळाली.