फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
India vs New Zealand Champion trophy 2025 Final Match : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी आता थोडाच वेळ शिल्लक आहे. काही तासांमध्ये भारताचा संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे तर न्यूझीलंडचा संघ मिचेल सॅन्टरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, भारताच्या संघाने न्यूझीलंडचा चॅम्पियन ट्रॉफीच्या लीग सामन्यांमध्ये पराभव केला होता. आता दुसऱ्या दोन्ही संघ भिडणार आहेत. याआधी न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याचे एक मोठे विधान समोर आले आहे.
यंग म्हणाला की, गट फेरीत भारताकडून झालेल्या पराभवाने फारसा फरक पडणार नाही. रविवारी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमचा संघ रोहित शर्माच्या संघाच्या कमकुवतपणाचा फायदा घेईल, असे तो म्हणाले. यावेळी विल यंग यांनी २००० साली खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील न्यूझीलंडच्या विजयाचा विशेष उल्लेख केला.
यंगने डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्यासोबत न्यूझीलंडला स्पर्धेत चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याने आयसीसीला सांगितले की, ग्रुप स्टेजमधील पराभवातून आपण खूप काही शिकलो आहोत. विशेषतः मी एक फलंदाज म्हणून, पण गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजांवर आणि त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवले आहे. तो म्हणाला की त्याने त्याची खेळण्याची शैली पाहिली आणि या परिस्थितीत तो कसा खेळेल हे देखील समजले.
या ३२ वर्षीय क्रिकेटपटूने सांगितले की, भारत आणि न्यूझीलंडने अनेक रोमांचक सामने खेळले आहेत आणि सामन्याच्या दिवशी जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. ते म्हणाले की, अलिकडेच भारत आणि न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि २०२३ वर्ल्ड कप सेमीफायनलसह खूप चांगले सामने खेळले आहेत. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, सामन्याच्या दिवशी, भूतकाळ काही फरक पडत नाही. यंग म्हणाले की, आम्ही रविवारी आव्हानांना तोंड देण्याचा प्रयत्न करू आणि दबाव यशस्वीरित्या हाताळू अशी आशा आहे.
२४ वर्षांपूर्वी नैरोबीमध्ये भारताला हरवून न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. २४ वर्षांच्या विजयापासून प्रेरणा . यंग म्हणाला की २४ वर्षांनी पुन्हा जिंकणे चांगले होईल. त्यावेळी मी आठ वर्षांचा होतो आणि माझे क्रिकेटवरील प्रेम नुकतेच सुरू झाले होते. मला आठवते ती स्पर्धा आणि ज्या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अनावरण झाले, स्कॉट स्टायरिस तिथे होता आणि त्याने त्या स्पर्धेबद्दल अनेक किस्से सांगितले. आशा आहे की आपण ते यश पुन्हा मिळवू शकू.