Photo Credit- Team navrashtra
हरियाणा: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने आता राजकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर विनेश फोगाटला हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश फोगट यांना उमेदवारी देण्यात आली. विनेशने या माध्यमातून राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला असला तरी हा प्रवासदेखील तिच्यासाठी अवघड वळणाचा ठरणार असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश करताच विनेश फोगाटने भाजपवर जोरदार हल्ला चढवला.” वाईट काळात तुमच्या पाठीशी कोण उभे आहे हे तुम्हाला कळते. आंदोलनादरम्यान आम्हाला रस्त्यावर ओढले जात होते, तेव्हा भाजप वगळता देशातील प्रत्येक पक्ष आमच्यासोबत होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी विनेश फोगाट जरी आवाज उठवत असली तरी ज्या जुलाना मतदारसंघातून तिला उमेदवारी देण्यात आली आहे तेथे काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट आहे.
हेदेखील वाचा: तुमच्यात हिंमत असेल तर…; संजय राऊतांचे अमित शाहांना खुले चॅलेंज
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी विनेश फोगeटला तिच्या सासरच्या मंडळींकडून जागा मिळाली आहे. पण गेल्या 19 वर्षांपासून जुलाना मतदारसंघातून काँग्रेस एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे ही जागा जिंकणे तिच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.
हरियाणाच्या जुलाना विधानसभा जागेबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेसचे दल सिंह यांनी 1967 मध्ये येथून निवडणूक जिंकली होती. वर्षभरानंतर त्यांची जागा स्वतंत्र पक्षाचे नारायण सिंह यांनी घेतली. 1970 मध्ये पोटनिवडणूक झाली आणि दल सिंग पुन्हा जुलानाचे आमदार म्हणून निवडून आले. 1972 मध्ये काँग्रेसचे फतेह सिंह जुलाना जागेवर विजयी झाले. 1977 मध्ये मोठा बदल झाला आणि जनता पक्षाचे जिलेसिंग विजयी झाले. 1982 आणि 1987 च्या विधानसभा निवडणुकीत जुलाना येथील जनतेने लोकदलाचे कुलबीर सिंह यांना आमदार म्हणून निवडून दिले. 1991 मध्ये जनता पक्षाने पुनरागमन केले आणि यावेळी सूरज भान विजयी झाले.
हेदेखील वाचा: धनंजय मुंडेंना नेमकी भीती कशाची? भल्या पहाटे घेतली मनोज जरांगेंची भेट
1996 मध्ये हरियाणा विकास पक्षाचे सत्यनारायण लाथेर जुलाना मतदारसंघातून विजयी झाले. 2000 आणि 2005 मध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा येथे विजय मिळवला. पण तेव्हापासून आजतागायत काँग्रेसला एकदाही या जागेवर विजय मिळवता आला नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला या जागेवरून 10 टक्क्यांहून कमी मते मिळाली होती. ही आकडेवारी विनेश फोगाटचे टेन्शन वाढवणारी आहे. मात्र, पॅरिस ऑलिम्पिकमधील चमकदार कामगिरी आणि नंतर पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न अपूर्ण राहिल्यानंतर ती लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. 2024 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिच्यासाठी भावनिक कार्ड उपयोगी पडू शकते. पण विनेश फोगाट जुलानासोबत काँग्रेसचे नशीब बदलणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.