फोटो सौजन्य - सोशल मीडिया
महिला T20 विश्वचषक : मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत होते की, महिला T२० विश्वचषक २०२४ बांग्लादेशमध्ये आयोजित करण्यात येणार होता. परंतु बांग्लादेशमधील परिस्थितीवर नजर टाकली असता तेथील सध्याची स्थिती चांगली नाही. देशात आरक्षणाबाबत आंदोलन झाले आणि ते हिंसक झाले. त्यामुळे तेथील वातावरण दूषित झाले आहे. याआधी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला होस्टिंगचा प्रस्ताव दिला होता. परंतु बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट नकार दिला आहे अशी माहिती समोर आली आहे. आता महिला T२० विश्वचषक २०२४ कुठे आयोजित केला जाणार अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेदेखील वाचा – मनु भाकरवर पैशांचा पाऊस! मिळाला 10 लाखांचा धनादेश, खेळाडू कोट्यवधींची मालकीण
आता UAE मध्ये महिला T२० विश्वचषक २०२४ चे आयोजन केले जाऊ शकते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. Cricbuzz च्या बातमीनुसार असे सांगण्यात आले आहे की, ICC महिला T२० विश्वचषकासाठी दुबई किंवा अबू धाबीचा विचार करत आहे. मात्र बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्याच्याकडे अजूनही वेळ मागितली आहे. याबाबत आयसीसी लवकरच निर्णय घेणार आहे. यासंदर्भात ऑनलाइन बैठकही प्रस्तावित करण्यात आली आहे. बीसीबीने आयसीसीकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. त्यामुळे २० ऑगस्टपर्यंत याबाबत निर्णय होऊ शकतो.
महिला T२० विश्वचषक २०२४ चे यजमानपद स्वीकारण्याची चांगली संधी होती. मात्र जय शहा यांनी कार्यक्रम आयोजित करण्यास नकार दिला होता. ते म्हणाले की, सध्या देशात पावसाळा सुरू आहे आणि मंडळाला प्रत्येकाने असे वाटू नये की त्यांना सतत स्पर्धांचे आयोजन करायचे आहे. मात्र, बांगलादेशने अद्याप यजमानपदाची आशा सोडलेली नाही. त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये यूएई तंदुरुस्त आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाकडे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत. यजमानपदासाठी झिम्बाब्वे आणि श्रीलंकाही इच्छुक आहेत. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.