Rahul Gandhi allegation Election Commission responsible for 16 deaths controversy
दिल्ली, वृत्तसंस्था. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणीवर टीका केली. ते म्हणाले की, एसआयआर ही सुधारणा नाही तर लादलेला त्रास आहे. निवडणूक आयोगाने ( Election Commission ) अशी व्यवस्था निर्माण केली आहे जी मतदारांना कंटाळवेल आणि मतदानाची चोरी अखंडपणे चालू राहील. एसआयआरने देशभरात अराजकता निर्माण केली आहे, ज्यामुळे तीन आठवड्यात १६ बीएलओंचा मृत्यू झाला. निवडणूक आयोगाने लादलेल्या एसआयआरमुळे हृदयविकाराचा झटका, ताण आणि आत्महत्या झाल्या आहेत. एसआयआरद्वारे मतचोरीचा आरोप करत राहुल ( Rahul Gandhi ) म्हणाले की, निवडणूक आयोगाने अशी व्यवस्था निर्माण केली, ज्यामध्ये नागरिकांना स्वतःला शोधण्यासाठी २२ वर्षांच्या मतदारयादीतील हजारो पाने स्कॅन केलेली पाने चाळावी लागतात.
कागदपत्रांचे जंगल तयार
राहुल यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकता आणि जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ते म्हणाले, भारत जगासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित करती, परंतु भारतीय निवडणूक आयोग अजूनही कागदपत्रांचे जंगल तयार करण्यावर ठाम आहे. हेतू स्पष्ट असता तर यादी डिजिटल, शोधण्यायोग्य आणि मशीन वाचनीय असती आणि निवडणूक आयोगाने ३० दिवसांच्या धाईघाईत काम पूर्ण करण्याऐवजी पारदर्शकता आणि जबाबदारीवर लक्ष केंद्रित केले असते.
भाजपाने रचला कट
काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, हे जाणूनबुजून उचललेले पाऊल आहे, जिथे नागरिकांना त्रास दिला जात असून बीएलओच्या अनावश्यक दबावामुळे होणाऱ्या मृत्यूना संपार्श्विक नुकसान म्हणून दुर्लक्षित केले जात आहे.
है अपयश नाही तर एक कट आहे: सत्तेचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीचा बळी दिला जात आहे.
६० बीएलओंविरुद्ध गुन्हा-मतदारयादीच्या एसआयआर प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील ६० बीएलओ आणि सात पर्यवेक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणा, उदासीनता आणि उच्च अधिकाऱ्याऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून विविध पोलिस ठाण्यामध्ये हे एफआयआर दाखल करण्यात आले. ४ डिसेंबरपर्यंत सर्व मतदारांची पडताळणी करणे आणि मतमोजणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. असे असूनही, अनेक बीएलओ त्यांच्या कामात निष्काळजीपणा दाखवत होते.
बीएलओला धमकी, अटक
मतमोजणी फॉर्मवर ९७ वर्षीय मतदारावी माहिती भरण्याबाबतच्या वादातून बीएलओला धमकावल्याबद्दल बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली, एसआयआर प्रक्रियेदरम्यान ही घटना घडली. अटक केलेल्या आरोपीचे नाव जमीरुल इस्लाम मुल्ला असे आहे, जो बसिरहाटच्या नजत भागातील सक्रिय तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. २००२ च्या विशेष पडताळणीच्या मतदारयादीत वृद्ध व्यक्तीचे नाव आढळल्यानंतर मुल्लाने बीएलओला गंभीर परिणामांची धमकी दिल्याचा आरोप आहे.
Ans: एसआयआर (Special Intensive Revision) ही मतदारयादीची विशेष पडताळणी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मतदारांची माहिती पुनः तपासली जाते.
Ans: पारदर्शकतेचा अभाव,डिजिटल, शोधण्यायोग्य यादी न देणे, नागरिकांना अनावश्यक कागदपत्रांच्या जंगलात अडकवणे
Ans: राहुल गांधी यांनी म्हटले की एसआयआरमुळे वाढलेल्या तणावामुळे १६ बीएलओंचा मृत्यू झाल्याचे रिपोर्ट आहेत.






