सौजन्य - wplt20 WPL 2025 : बंगळुरूच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीचा डाव घसरला; अवघ्या 141 धावांवर ऑलआऊट
WPL 2025 Royal Challenger Bangalore vs Delhi Capitals : WPL 2025 मध्ये चौथ्या टी-20 सामन्यात बंगळुरू प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक राहिली. त्यांची सलामीवीर शेफाली वर्मा 0 शून्यावरच बाद झाली. त्यानंतर सलामीवर मे लॅनिंगने 17 धावा केल्या. त्यानंतर वन डाऊन आलेल्या जेमिमा रॉड्रीग्जने 34 धावा केल्या. अॅनबेल सुथरलॅंडने 19 धावा केल्या. मारिझाने कॅपने 12 धावांचे योगदान दिले.
जेस जॉनसन अवघी 1 झाला करून तंबूत परतली. विकेटकीप साराह ब्रेस आणि शिखा पांडे यांची चांगली भागीदारी जमलेली असताना, साराह ब्रेसला रिचा घोषने जोर्जिया वारेहमच्या चेंडूवर स्टम्पिंग करीत तंबूचा रस्ता दाखवला. शेवटची विकेटसाठी अरूंधती रेड्डी आणि मिनू मानी यांनी 9 धावांची भागीदारी केली परंतु बंगळुरूच्या गोलंदाजीसमोर अरुंधती रेड्डीदेखील 4 धावा करून परतली.
बंगळुरूच्या भेदक गोलंदाजी समोर शेवटच्या फळीतले फलंदाज गडगडले
बंगळुरूची गोलंदाजी
बंगळुरूकडून रेणुका ठाकूर सिंहने 3 विकेट घेतल्या तर किम गर्थ, एकता बिश्ट यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. त्यानंतर जोर्जिया बारेहमला 3 विकेट्स मिळाल्या. कनिका अहुजा आणि जोशिता यांना एकही विकेट मिळाली नाही. परंतु, बंगळुरूच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीला जखडून ठेवत 141 धावांवरच रोखले.