केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
India vs England : २० जूनपासून इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वीच इंग्लंडने भारताचे आव्हान परतून लावण्यासाठी जोरदार योजना आखली आहे. इंग्लंडच्या १९ वर्षीय गोलंदाजाला इंग्लंड संघाने त्यांच्यासोबत सराव करण्यासाठी पाचारन केले आहे. एडी जॅकला इंग्लंडच्या वरिष्ठ संघाच्या शिबिरात समाविष्ट करण्यात आले आहे. जिथे संघ भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांसाठी जय्यत तयारी करत आहे.
एडी जॅक इंडिया अ विरुद्धच्या दोन अनधिकृत सामन्यांमध्ये इंग्लंड लायन्स संघात समाविष्ट होता. दुसऱ्या कसोटीत केएल राहुलला बाद करून त्याने निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्यानंतर आता त्याला वरिष्ठ संघासोबत सराव करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. एडी जॅक हा एक उंच गोलंदाज असून त्याची उंची ६ फूट ४ इंच आहे. अशा परिस्थितीत त्याला पृष्ठभागावरून जास्त उसळी मिळायला मदत मिळते.
द टाइम्स लंडनमधील वृत्तानुसार, जॅककडून इंग्लंड लायन्सच्या प्रशिक्षक गटाला खूप प्रभावित करण्यात आले आहे. या प्रशिक्षकपदी अँड्र्यू फ्लिंटॉफ, मार्क वूड आणि ग्रॅमी स्वान सारखे अनुभवी खेळाडू होते. जॅकने अद्याप हॅम्पशायरसाठी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केलेले नसून त्याने दोन प्रथम श्रेणी सामने खेळलेले आहेत.
गेल्या महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या सराव सामन्यात संयुक्त काउंटी इलेव्हनकडून खेळत असताना जॅकने पाच बळी घेतले होते. त्यानंतर जॅकने नॉर्थम्प्टनमध्ये भारताविरुद्ध नितीश रेड्डी आणि ध्रुव जुरेल यांना माघारी पाठवले होते. त्याला आता वरिष्ठ संघात ठेवण्यात आले आहे आणि गरज पडल्यास इंग्लंड त्याला त्यांच्या मुख्य संघात डेकही स्थान देऊ शकते.
आगामी कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला वेगवान गोलंदाजी विभागात कठीण परिस्थितीला सामोरे जावे लगता आहे. जोफ्रा आर्चर पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे. तर, अनुभवी वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे संपूर्ण उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध असणार नाही. याशिवाय, तरुण वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन देखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. दोन आठवड्यांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटीत त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला होता, ज्यातून तो आता बरा होत आहे.
हेही वाचा : SA vs AUS : टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार! पॅट कमिन्ससमोर फलंदाजीचे आव्हान
तसेच, ख्रिस वोक्स आता दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. त्याने इंडिया अ विरुद्ध शानदार गोलंदाजी करत आपली छाप पडली आहे. वोक्सने ३२ षटकांत ५ बळी मिळवले आहेत. तर जोश टँगने देखील २ बळी घेतले आणि त्याची तंदुरुस्ती दाखवून दिली आहे. अशा परिस्थितीत एडी जॅकचा संघात स्थान देण्यात आले आहे. तो आगामी पाचही सामन्यांसाठी संघासोबत प्रवास करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.