फोटो सौजन्य : England Cricket
जेमी स्मिथ आणि बेन डकेट रेकाॅर्ड : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये काल टी ट्वेंटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजय मिळवून मालिका एकतर्फी जिंकली. इंग्लंडच्या संघाने मालिकेतील शेवटचा सामना हा वेस्टइंडीज च्या संघाला 26 धावांनी पराभूत केले. मालिकेचे तीनही सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजय मिळवून मालिका जिंकली आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. इंग्लिश सलामीवीर फलंदाज जेमी स्मिथ आणि बेन डकेट यांनी कमालची कामगिरी केली आहे आणि आत्ता त्यांनी त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे.
मंगळवारी 10 जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामना पार पडला, या सामन्यात इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जेमी स्मिथ यांनी शतकी भागीदारी करून इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरण्यात आले आहे. साउथहॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात डकेट आणि स्मिथने फक्त ५३ चेंडूत १२० धावांची शानदार भागीदारी केली. दोघांनी मिळून १३.५८ च्या धावगतीने धावा केल्या. या इंग्लिश जोडीने वादळी पद्धतीने शतकी भागीदारी करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
SA vs AUS : टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार! पॅट कमिन्ससमोर फलंदाजीचे आव्हान
डकेट आणि स्मिथ यांनी शतकीय भागीदारी करून त्याचे नाव इतिहासात कोरले आहे. दोघांनीही इंग्लंडच्या भूमीवर सर्वात जलद शतकी भागीदारीचा विक्रम केला आणि ख्रिस गेल आणि आंद्रे फ्लेचर यांचा १६ वर्ष जुना विक्रम मोडला. गेल-फ्लेचर यांनी २००९ मध्ये इंग्लंडच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद शतकी भागीदारीचा विक्रम केला होता. इंग्लंडमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त तीनच सलामी जोडी आहेत ज्यांनी १० पेक्षा जास्त धावगतीने शतकी भागीदारी पूर्ण केली आहे.
१० पेक्षा जास्त धावगतीने धावा करणाऱ्या यादीमध्ये तिसरी जोडी पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानची यांची जोडी आहे, ज्यांनी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध १०.२ च्या धावगतीने १५० धावा जोडल्या होत्या.