• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Advertisement Will See On Amazon Prime Video In India And Others Country

पैसे घेऊनही प्राइम व्हिडिओवर जाहिराती दिसणार? Amazon चे नियोजन आहे तरी काय? जाणून घ्या

भारत, ब्राझील, जपान, नेदरलँड आणि न्यूझीलंड या देशांमध्ये येत्या काही दिवसांतच कंपनीचा नवीन निर्णय लागू केला जाणार आहे. या निर्णयानुसार प्राइम व्हिडिओवर युजर्सना जाहिराती दिसणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2024 | 08:05 AM
पैसे घेऊनही प्राइम व्हिडिओवर जाहिराती दिसणार? Amazon चे नियोजन आहे तरी काय? जाणून घ्या

पैसे घेऊनही प्राइम व्हिडिओवर जाहिराती दिसणार? Amazon चे नियोजन आहे तरी काय? जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ भारतात प्राईम मेंबर्सना देखील लवकरच जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जातं आहे. जाहिरात व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षापासून प्राईम व्हिडिओ युजर्सना चित्रपट आणि वेबसिरीजमधील जाहिराती पाहाव्या लागतील. वापरकर्त्यांसाठी एक जाहिरात मुक्त पर्याय देखील असेल परंतु त्यांना त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. एमएक्स प्लेयर खरेदी केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

हेदेखील वाचा- 6000 mAh बॅटरीसह लाँच झाला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी

जर तुमच्याकडे अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्ही देखील आतापर्यंत जाहिरातींशिवाय चित्रपट आणि वेबसिरीजचा आनंद घेतला असेल, पण आता लवकरच यामध्ये व्यत्यय येणार आहे. कंपनी लवकरच प्राइम व्हिडिओ यूजर्ससाठी जाहिराती देण्याची योजना करत आहे. कंपनी लवकरच भारतात प्राईम व्हिडिओ मेंबर्सना जाहिराती दाखवण्यास सुरुवात करेल. हा निर्णय अनेक देशांमध्ये लागू करण्यात आल्या असून अनेक देशांमध्ये आधीच जाहिराती दिसू लागल्या आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

पैसे देऊनही जाहिराती पहाव्या लागणार

जाहिरात व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचललं आहे. रिपोर्टनुसार, पुढील वर्षापासून यूजर्सला प्राइम व्हिडिओवर चित्रपट किंवा वेबसीरिज पाहताना जाहिराती पाहाव्या लागतील. युजर्सला ॲड फ्री ऑप्शन देखील मिळेल, पण यासाठी त्यांना आतापेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनी काही नवीन योजना देखील आणणार आहे. ज्याची माहिती लवकरच मिळू शकेल.

व्यवसाय पुढे नेण्याचे उद्दिष्ट

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, मेक्सिको, स्पेन आणि यूके सारख्या देशांमध्ये प्राईम व्हिडिओ मेंबर्सना जाहिराती दिसू लागल्या आहेत. आता कंपनी भारतासह आणखी अनेक देशांमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात करणार आहे. या देशांमध्ये ब्राझील, जपान, नेदरलँड आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की व्हिडिओच्या मध्यभागी जाहिराती दर्शविण्यामागील उद्देश आपला महसूल वाढवणे आहे. पैशांमुळे कंपनीच्या बिझनेस मॉडेलवर परिणाम होऊ नये म्हणून हे केले जात आहे.

हेदेखील वाचा- वाय-फायचा पासवर्ड विसरलात? कळजी करण्याची गरज नाही, या टीप्स वापरून पाहा

ॲमेझॉनने म्हटले आहे की इतर OTT च्या तुलनेत जाहिराती कमी असतील. जरी आम्ही चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये जाहिराती दाखवण्याचा विचार करत असलो तरी आमचे जाहिरात धोरण इतर स्ट्रीमिंग कंपन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. जाहिराती येथे दाखवल्या जातील, परंतु त्यांची संख्या इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत खूपच कमी असेल.

प्राईम व्हिडिओ मेंबर्सना माहिती मिळणार

ॲमेझॉनने असेही स्पष्ट केले आहे की प्राइम व्हिडिओवर जाहिराती दाखवण्यापूर्वी यूजर्सना ईमेलद्वारे कळवले जाईल की कंपनी असे करणार आहे. युजर्सना जाहिराती दाखवण्याबाबत काही आठवडे अगोदर माहिती दिली जाईल. कंपनीने असेही म्हटले आहे की सध्या प्राइम मेंबरशिपमध्ये बदल करण्याची कोणतीही योजना नाही. सध्याचे 1499 रुपयांचे सबस्क्रिप्शन असेच उपलब्ध राहील. कंपनीने MX Player खरेदी केल्यानंतर जाहिरात दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. आता MX Player देखील कंपनीच्या डिजिटल जाहिरात महसुलात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Web Title: Advertisement will see on amazon prime video in india and others country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 08:05 AM

Topics:  

  • amazon
  • Amazon Prime
  • amazon prime video

संबंधित बातम्या

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका
1

Flipkart – Amazon Sale 2025: कुठे स्वस्त मिळतोय Samsung Galaxy S24 Ultra 5G? बेस्ट Deal वर एक नजर टाका

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी
2

Amazon Great Indian Festival 2025: 3D कर्व्ड AMOLED स्क्रीनवाल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट, 18 हजारांहून कमी किंमतीत करा खरेदी

Devendra Fadnavis: “राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Devendra Fadnavis: “राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Flipkart – Amazon Sale 2025: या कारणांमुळे ऑनलाइन सेलमध्ये कमी होतात प्रोडक्टच्या किंमती, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
4

Flipkart – Amazon Sale 2025: या कारणांमुळे ऑनलाइन सेलमध्ये कमी होतात प्रोडक्टच्या किंमती, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.