Airtel ची ग्राहकांना मोठी भेट! केवळ इतक्या रुपयांत मिळणार मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन आणि 50 GB डेटा, जाणून घ्या
तुम्ही Airtel युजर आहात का? शिवाय क्रिकेटप्रेमी देखील आहात? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel ने त्यांच्या ग्राहकांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी एक खास धमाकेदार ऑफर आणली आहे. Airtel ने सुरू केलेल्या या नवीन ऑफरमध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटाच्या फायद्यांसोबतच JioHotstar सबस्क्रिप्शन 90 दिवसांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
कंपनीच्या या ऑफरमुळे ग्राहक आयपीएलची मॅच लाईव्ह पाहू शकणार आहेत आणि यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची देखील गरज नाही. म्हणजेच आता ग्राहक Airtel च्या रिचार्ज पॅकमध्ये इंटरनेट डेटासोबत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय JioHotstar चा देखील आनंद घेऊ शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Airtel ने लाँच केलेल्या या खास रिचार्ज प्लॅनची किंमत 451 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे, परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे एक ‘डेटा व्हाउचर’ आहे, म्हणजेच कंपनीचा हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये एक सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. 451 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि एसएमएस योजना ऑफर केल्या जात नाहीत. या योजनेत व्हॉइस कॉल किंवा एसएमएसची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे एसएमएस आणि कॉलिंगचा वापर करण्यासाठी एक बेसिक रिचार्ज प्लॅनची गरज आहे.
तुम्ही 50 जीबी डेटा लवकर संपवला तरी तुमचे इंटरनेट पूर्णपणे डिस्कनेक्ट होणार नाही. FUP (फेअर यूसेज पॉलिसी) अंतर्गत, डेटा संपल्यानंतर, तुमचा इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी केला जाईल, जेणेकरून तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम करू शकाल. म्हणजेच तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट डेटा वापरण्याची संधी मिळणार आहे.
Airtel च्या या प्लॅनसह कंपनी त्यांच्या युजर्सना 90 दिवसांसाठी मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन ऑफर करते. याद्वारे, तुम्ही आयपीएल 2025 चे सर्व लाईव्ह सामने पाहू शकता शिवाय वेब सिरीज, चित्रपट, अॅनिमेशन शो आणि वेब सीरिजचा देखील आनंद मोबाईल आणि टीव्ही दोन्हीवर घेऊ शकता.
JioHotstar प्लॅटफॉर्मच्या पेड व्हर्जनची किंमत 149 रुपयांपासून सुरू होते, परंतु Airtel चा हा प्लॅन तुम्हाला हेच सबस्क्रिप्शन मोफत वापरण्याची संधी देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला इंटरनेट डेटा आणि JioHotstar या दोन्हीचा आनंद घ्यायचा असेल तर हा प्लॅन रिचार्ज प्लॅन बेस्ट ठरू शकतो. Airtel सोबतच इतर टेलिकॉम कंपन्या देखील रिचार्ज प्लॅनसोबत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन त्यांच्या ग्राहकांना ऑफर करतात. याचा फायदा म्हणजे ग्राहकांना इंटरनेट डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सोबतच इतर प्लॅटफॉर्मचा देखील आनंद घेता येतो.






