Motorola Edge 70 Ultra Leak: कॅमेरा फोनचा नवा किंग? लाँचपूर्वीच सुरु झाली फीचर्सची चर्चा, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाका
अशी शक्यता वर्तवली जात आहे की, हा आगामी स्मार्टफोन Edge 50 Ultra चा सक्सेसर असणार आहे, जो जून 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता. लीक झालेल्या माहितीवरून असा अंदाज लावला जात आहे की, या रूमर्ड हँडसेटमध्ये अपग्रेडेड परफॉर्मेंस ऑफर केला जाण्याची शक्यता आहे. Edge 50 Ultra मध्ये Snapdragon 8s Gen 3 चिप दिली आहे. तर या स्मार्टफोनच्या सक्सेसरमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. Motorola Edge 70 Ultra च्या लीक झालेल्या रेंडर्समध्ये फोनचे डिझाईन समोर आले आहे. डिव्हाईस टेक्सचर्ड रियर पॅनल पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये टॉप-लेफ्ट कॉर्नरमध्ये एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे. (फोटो सौजन्य – X)
वीबोवर ‘पांडा इज बाल्ड’ (चीनी मधून अनुवादित) नावाच्या एका टिप्स्टरने कथित Moto X70 Ultra च्या मुख्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लीक झाल्याचे सांगितलं आहे. स्मार्टफोन टेक फर्म द्वारे Motorola Edge 70 Ultra च्या रुपात ग्लोबली लाँच केला जाण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि ब्रॉन्ज कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी स्मार्टफोन क्वालकॉमच्या ऑक्टा कोर Snapdragon 8 Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार आहे, जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 26 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आला होता. जर ही लीक खरे असेल तर हा स्मार्टफोन मागील मॉडेल, Motorola Edge 50 Ultra च्या तुलनेत एक जबरदस्त अपग्रेड असणार आहे, जो Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरवर आधारित होता. ऑनलाइन अशा प्रकारची माहिती समोर येण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी, स्मार्टफोन मेकरने अद्याप अल्ट्रा मॉडेलच्या लाँचची पुष्टी केलेली नाही.
Motorola च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फ्लॅट OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1.5K रेजोल्यूशन असी शकते. Motorola Edge 50 Ultra च्या तुलनेत हा एक माइनर डाउनग्रेड असणार आहे, कारण यामध्ये 6.7-इंच LTPS pOLED स्क्रीन आहे आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1.5K (1,220×2,712 पिक्सल) रेजोल्यूशन आहे. Edge 50 Ultra मध्ये गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन, HDR10+ कंटेंट सपोर्ट आणि 2500nits पर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Motorola Edge 70 Ultra मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य शूटर, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. हे त्याच्या मागील मॉडेलच्या तुलनेत थोडेसे डाउनग्रेड असल्याचे दिसते, ज्यामध्ये 3x ऑप्टिकल झूम क्षमतेसह 64-मेगापिक्सेल (f/2.4) टेलिफोटो कॅमेरा होता.
Ans: Motorola Edge Series ही Motorola ची प्रीमियम आणि मिड-प्रीमियम स्मार्टफोन सिरीज आहे, जी कॅमेरा, परफॉर्मन्स आणि कर्व्ह्ड डिस्प्लेसाठी ओळखली जाते.
Ans: फोटोग्राफी लवर्स, गेमर्स, स्टॉक Android पसंत करणारे युजर्स आणि प्रीमियम लूक हवा असलेल्यांसाठी हे फोन योग्य आहेत.
Ans: Motorola Edge सीरीजमध्ये 50MP/200MP प्रायमरी कॅमेरा, OIS, अल्ट्रा-वाइड आणि टेलीफोटो लेन्स दिल्या जातात, ज्यामुळे प्रो-लेव्हल फोटोग्राफी शक्य होते.






