Recharge Plan: आत्ताच रिचार्ज करा, 2026 संपेपर्यंत सुरु राहिल प्लॅन, हे आहेत जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये यूजर्सना पूर्ण वर्षभरासाठी म्हणजे 365 दिवसांसाठी रिचार्जची चिंता करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.5GB डेटाच्या हिशोबाने वर्षभर 912.5GB डेटा मिळणार आहे. हा प्लॅन त्यांच्या यूजर्सना अनलिमिटेड वॉइस कॉल आणि रोज 100 फ्री SMS भी ऑफर करतो. यासोबत या प्लॅनमध्ये यूजर्सना फॅनकोड, 3 महीन्यांसाठी जियोहॉटस्टार आणि 18 महीन्यांसाठी गूगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाणार आहे. यासोबतच एलिजिबल यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा फ्री मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला फॅनकोडचे सब्सक्रिप्शन नको असेल तर तुम्ही 3599 रिचार्ज प्लॅनची निवड करू शकणार आहे. या प्लॅनमध्ये फॅनकोडचे सब्सक्रिप्शन सोडल्यास 3999 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना डेली 2.5GB डेटा, फ्री कॉलिंग, जियोहॉटस्टार आणि गूगल जेमिनी प्रोचे फ्री सब्सक्रिप्शन इत्यादी ऑफर केले जाणार आहे.
एयरटेल देखील जिओप्रमाणे 3999 रुपयांच्या किंमतीत अॅनुअल प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 5G आणि डेली 2.5GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग, डेली 100 SMS आणि स्पॅम अलर्ट देखील दिला जाणार आहे. फ्री सब्सक्रिप्शनबद्दल बोलायचं झालं तर, या प्लॅनसोबत एयरटेल यूजर्सना कोणत्याही अतिरिक्त पैशांशिवाय एका वर्षासाठी जियोहॉटस्टार आणि इतक्याच काळासाठी परप्लेक्सिटी प्रोचा फायदा घेऊ शकणार आहेत.
या प्लॅनमध्ये एयरटेल एका वर्षाचे जियोहॉटस्टार सब्सक्रिप्शन सोडून 3999 रुपयांमध्ये मिळणारे सर्व फायदे मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2.5GB डेटा, अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि परप्लेक्सिटी प्रोचे वर्षभराचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे.






