नुकताच आयफोन कंपनीने आपली नवीनतम iPhone 16 सिरीज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. ॲपलच्या फ्लॅगशिप iPhone 16 सीरीजच्या प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या मालिकेतील चारही मॉडेल्सची शिपिंग 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवीन आयफोन बुक करण्यासाठी लोकांमध्ये मोठी स्पर्धा आहे. महाग असूनही, ऍपल इंडियाच्या साइटला प्री-ऑर्डरच्या काही काळ आधी समस्यांचा सामना करावा लागला.
तुम्हालाही आयफोन सीरीजचे कोणतेही मॉडेल ऑफरसह प्री-बुक करायचे असल्यास, तुमच्यासाठी ॲपलच्या प्रीमियम पार्टनर Imagine वर एक खास संधी आहे. imagine हे ॲपल उत्पादनांचे देशभरातील रिसेलर आहे. यासाठी काय करावे लागेल याविषयी जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Huawei Mate XT: जगातील पहिला ट्राय-फोल्डिंग स्मार्टफोन, भारतात किती किंमत? जाणून घ्या
Imagine by Apple ने iPhone 16 सिरीज प्री-ऑर्डर करण्यावर काही दमदार ऑफर जाहीर केल्या आहेत. “More with Imagine” कॅम्पेनमध्ये अनेक प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. या अंतर्गत, युजर्सना 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान केवळ 5,000 रुपयांमध्ये iPhone 16 प्री-बुक करण्याची संधी उपलब्ध होत आहे.
हेदेखील वाचा – BSNL 5G ची प्रतीक्षा संपली! केंद्रीय मंत्र्यांनी दिला ग्रीन सिंग्नल,TATA लवकरच लाख टॉवर बसवणार
128GB: 79,900 रुपये
256GB: 89,900 रुपये
512GB: 1,09,900 रुपये
128GB: 89,900 रुपये
256GB: 99,900 रुपये
512GB: 1,19,900 रुपये
128GB: 1,19,900 रुपये
256GB: 1,29,900 रुपये
512GB: 1,49,900 रुपये
1TB: 1,69,900 रुपये
256GB: 1,44,900 रुपये
512GB: 1,64,900 रुपये
1TB: 1,84,900 रुपये