देशातील प्रसिद्ध टेक कंपन्यांनी रिचार्ज किमतीत वाढ केल्यानंतर बीएसएनएल नेटवर्कच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. या संधीचा फायदा घेत बीएसएनएलनेही युजर्ससाठी अनेक बदल घडवून आणले. दरम्यान, बीएसएनएलने आता नवा प्लॅन तयार केला आहे. यामध्ये, 5G नेटवर्क आणण्यापासून ते 4G नेटवर्कचे जाळे आता पसरवले जाणार आहेत. नुकतीच याबाबतची नवीन माहिती समोर आली आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
बीएसएनएलबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वक्तव्य सध्या फार चर्चेत आहे. 4G नेटवर्क लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कंपनीने यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सोबत हातमिळवणी केली आहे आणि आता टाटा नवीन डेटा सेंटर देखील स्थापन करत आहे. ते कसे कार्य करेल आणि यात कोणते नवीन फीचर्स असतील? याविषयी आम्ही तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत, चला तर मग सुरुवात करूया-
हेदेखील वाचा – Huawei Mate XT: जगातील पहिला ट्राय-फोल्डिंग स्मार्टफोन, भारतात किती किंमत? जाणून घ्या
बीएसएनएल पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत 1 लाख 4G टॉवर्स बसवणार असल्याचे समजले आहे. यंदा बीएसएनएलकडून टॉवर बसवण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यापूर्वीच सांगितले आहे. सुमारे 1 लाख टॉवर बसवण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यादृष्टीने लक्ष्यही निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळेच हे लक्ष्य गाठण्यासाठी कंपनीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाला बीएसएनएलकडून लवकरच वेगवान इंटरनेट मिळणार आहे.
हेदेखील वाचा – iPhone 9 आणि Windows 9 का नाही? मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलने सांगितले 9 नंबर स्किप करण्यामागचे कारण
बीएसएनएलने आतापर्यंत 25 हजार 4G टॉवर बसवले आहेत. दिवाळी 2024 पर्यंत 75 हजार साइट्स पूर्ण होतील, असे बीएसएनएलने सांगितले होते. मात्र सध्या तसे होताना दिसत नाही. भारताकडून स्वतःचे 4G नेटवर्क स्थापन करण्याचे काम केले जात आहे. हे कोणत्याही भारतीय टेलिकॉम ऑपरेटरने केलेले नाही. म्हणजेच हे पहिले पूर्णपणे भारतीय नेटवर्क असणार आहे. असे करणारी बीएसएनएल ही पहिली कंपनी ठरली जाईल. Jio ने स्वतःचा 5G ट्रॅक तयार केला आहे, तर 4G सॅमसंगच्या मदतीने पूर्ण करण्यात आला आहे.