AMAZON (फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
Amazon वर लवकरच Great Summer Sale सुरू होणार आहे ज्यामध्ये स्मार्टफोनवर मोठी सूट बघायला मिळेल. सेल दरम्यान, Galaxy S24 Ultra, iPhone 15, iQoo Neo 10R, OnePlus 13R आणि Samsung Galaxy M35 5G हे स्मार्टफोन खूप स्वस्त मिळू शकतात. या सर्व फोनवर विशेष बँक ऑफर्स देखील बघायला मिळेल.
या यादीत सॅमसंगचे Galaxy S24 Ultra आणि iPhone 15, iQoo Neo 10R, OnePlus 13R यांचाही समावेश आहे. या सर्व फोनवर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध असतील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून तुमचा जुना फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर या टॉप ५ स्मार्टफोन डीलबद्दल आधीच जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही सेल दरम्यान तुमची ऑर्डर लवकर प्लेस करू शकाल. चला या डील्सवर एक नजर टाकूया…
Amazon Summer Sale चे टॉप 5 स्मार्टफोन डील
Apple iPhone 15
जर तुम्ही अॅपल घ्याचा विचार करत असाल, तर Amazon सेलमध्ये iPhone 15 वर मोठी सूट मिळणार आहे. Amazon वर फक्त 57,749 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होऊ शकते. या डिव्हाइसमध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले, Apple A16 बायोनिक चिपसेट आणि 48MP चा मुख्य कॅमेरा आहे .
Samsung Galaxy S24 Ultra 5G
या यादीतील दुसरा फोन Samsung Galaxy S24 Ultra 5G आहे जो Amazon सेल दरम्यान 84,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असेल. एवढेच नाही तर, तुम्हाला HDFC क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर 10% बँक सूट देखील मिळू शकते. जर तुम्ही फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम डील असू शकते.
OnePlus 13R
या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेला OnePlus 13R देखील सेलमध्ये खूप स्वस्त मिळू शकतो. सेल दरम्यान हा फोन 39,999 रुपयांना विकला जाईल. याशिवाय, तुम्ही फोनसोबत 3,999 रुपयांचा OnePlus Buds 3 देखील मोफत मिळवू शकता.
Samsung Galaxy M35 5G
या सेलमध्ये Samsung Galaxy M35 5G, जो सर्वात जास्त पसंतीचा सॅमसंग फोन आहे, तो देखील सवलतीसह उपलब्ध होऊ शकतो. सेलमध्ये तुम्ही हा फोन फक्त 13,999 रुपयांना खरेदी करू शकाल. या डिव्हाइसमध्ये FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.
iQOO Neo 10R 5G
यादीतील शेवटचा फोन म्हणजे iQoo Neo 10R 5G जो खिशाला परवडणारा पर्याय असू शकतो. फोनवर एकूण 4,250 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते, त्यानंतर त्याची किंमत फक्त 13,249 रुपये असेल. या डिव्हाइसमध्ये 6,400mAh ची मोठी बॅटरी आणि 80W फास्ट चार्जर आहे.