Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स
Google Pixel 10 स्मार्टफोनच्या खरेदीवर आता 11,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लाँच किंमतीपेक्षा अत्यंत कमी किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. क्लीन अँड्रॉयड इंटरफेस, दमदार कॅमेरा कॅपेबिलिटीज आणि AI-पावर्ड फीचर्ससाठी Google Pixel 10 ओळखला जातो. हा स्मार्टफोन फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये एक दमदार डिव्हाईस मानले जाते. Google Pixel 10 जर तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google Pixel 10 भारतात 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटवर 11,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. या स्मार्टफोनवर 6 हजार रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ग्राहक बँक ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकतात. आणखी बचत करण्यासाठी, तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 67,550 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तथापि, ही किंमत फोनच्या ब्रँड आणि स्थितीवर अवलंबून असेल.
Google Pixel 10 स्मार्टफोन Tensor G5 चिपसेटवर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 4,970mAh बॅटरी आहे, जी 30W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W पर्यंत वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच OLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सची पीक ब्राइटनेस आहे. यासोबतच स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ने प्रोटेक्टेड आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, Google Pixel 10 मध्ये मॅक्रो फोकससह 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 5× ऑप्टिकल झूमसह 10.8MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 10.5MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.






