BSNL (फोटो सौजन्य - PINTEREST)
सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने 5G इंफ्रास्ट्रक्चरची टेस्टिंग सुरु केली आहे. आता जयपूर, लखनऊ, चंदिगढ, भोपाल, कोलकाता, पटना, हैद्राबाद, चेन्नई आणि अनेक राज्याच्या राजधानीमध्ये टावर साईट्स वर ऑपरेशन सुरु झाला आहे. बिझनेस स्टँडर्डने बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, यापैकी बहुतेक साइट्स 4G साइट्स आहेत, ज्या 1 लाख 4G साइट्सचा भाग म्हणून स्थापित केल्या गेल्या आहेत.
Ghibli: घिबली, जिबली की गिबली? नेमका उच्चार जाणून घ्यायचाय? मग आमची बातमी वाचाच…
लवकरच बीएसएनएल ५जी
बीएसएनएल पुढील तीन महिन्यांत अधिकृतपणे 5G ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना आखत आहे, परंतु सध्या दूरसंचार वर्तुळात नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरची चाचणी घेतली जात आहे. जिथे बीएसएनएलची स्थिती मजबूत आहे. बीएसएनएल कानपूर, पुणे आणि विजयवाडा सारख्या अनेक शहरांमध्ये बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (बीटीएस) देखील सुरू करत आहे असे अहवालात म्हंटले आहे.
बीएसएनएलकडे एक लाख ४जी टॉवर्स आहेत, जे स्वदेशी घरेलू टेक्नोलॉजी वर आधारित आहेत जे जून २०२५ पर्यंत पूर्णपणे कार्यरत होतील. त्यांनतर हे ४जी टॉवर्स ५ जी मध्ये रुपातंरित केले जातील. बीएसएनएलने शेयर केल्याप्रमाणे, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया हे याची पृष्टि करताना दिसले. म्हणजेच आता बीएसएनएल 4G आणि 5G लाँच होण्यास फक्त तीन महिने बाकी आहेत.
बीएसएनएलने अधिकृत X सोशल मीडिया अकाउंटवर एप्रिल महिना ग्राहक सेवा महिना म्ह्णून गोष्टीत केला आहे. जो सेवा अभिप्रायावर सक्रियपणे काम करून ग्राहकांच्या अनुभव सुधारण्यासाठी एक उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण, शहरी, उद्योग आणि किरकोळ क्षेत्रातील ग्राहकांना मोबाईल नेटवर्कची गुणवत्ता सुधारणे, फायबर टू इंटरनेट ब्रॉडबँड (FTTH) आणि लीज्ड सर्किट/MPLS वाढवणे, बिलिंग पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि कस्टमर ग्रीवेंस रिजॉल्यूशनला बेहद करून पुन्हा जोडणे आहे.
BSNL ने शेयर केला व्हिडीओ
३१ मार्च २०२५ रोजी उशिरा शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये बीएसएनएलने म्हटले आहे की “मोठे सरप्राईझ येत आहेत! या ग्राहक सेवा महिन्यात, आम्ही तुमचा अनुभव अधिक चांगला करत आहोत. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्कात रहा!”