AI फीचर्ससह भारतात लाँच झाला Motorola Edge 60 Fusion, तगडी बॅटरी आणि असे आहेत स्पेसिफिकेशन्स; जाणून घ्या किंमत
स्मार्टफोन कंपनी Motorola ने आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Fusion लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 30 हजारांहून कमी आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मीडियाटेकच्या पावरफुल डाइमेंसिटी 7400 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
Poco च्या नवीन स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, या दिवशी भारतात करणार एंट्री! किंमत 7 हजारांहून कमी
Motorola ने लाँच केलेल्या या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्स दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकतील. हा फोन विशेष IP68 आणि IP69-रेटेड धूळ आणि पाणी-प्रतिरोधक आणि MIL-810H ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशनसह येतो ज्यामुळे तो आणखी टिकाऊ बनतो. चला तर मग आता या AI फीचर्सनी भरलेल्या स्मार्टफोनबाबत जाणून घेऊया. स्मार्टफोनची किंमत काय आहे आणि यामध्ये कोणते फीचर्स आहेत, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 256GB आणि 12GB + 256GB याचा समावेश आहे. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची 24,999 रुपये आहे. तुम्ही हा नवीन स्मार्टफोन लवकरच फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडिया वेबसाइटवरून खरेदी करू शकता. फोनचा पहिला सेल 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. हे डिव्हाईस पॅन्टोन अमेझॉनाइट, पॅन्टोन स्लिपस्ट्रीम आणि पॅन्टोन झेफायर रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
मोटोरोलाच्या या नवीन फोनमध्ये, 6.7 इंचाची 1.5K ऑल-कर्व्ड pOLED स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 4,500nits पीक ब्राइटनेस मिळते. यासोबतच फोनमध्ये वॉटर टच 3.0 आणि HDR10+ चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिस्प्ले अधिक मजबूत करण्यासाठी, त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i संरक्षण आहे.
Motorola Edge 60 Fusion launched in India.
Price 💰 ₹22,999Specifications:
📱 6.67″ 1.5K Quad curved AMOLED display, 120Hz refresh rate, 1400nits HBM, Gorilla glass 7i protection
🔳 MediaTek Dimensity 7400 chipset
UFS 2.2 storage, LPDDR4X RAM
🍭 Android 15
3 OS +4 years of… pic.twitter.com/PKSfA0fmDv— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 2, 2025
Motorola Edge 60 Fusion मध्ये शक्तिशाली मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर आहे, जो 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB uMCP ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. याच्या मदतीने तुम्ही फोनची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. हा फोन अँड्रॉइड 15-बेस्ड हॅलो UI सह येतो आणि त्याला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील.
कॅमेराच्या बाबतीत बोलायचे झाले तर फोन फोटोग्राफीसाठी एक उत्तम पर्याय आहे. या फोनमध्ये तुम्हाला f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह 50-मेगापिक्सेल सोनी LYT700C प्रायमरी सेन्सर मिळतो. यासोबतच, डिव्हाइसमध्ये f/2.2 अपर्चरसह 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि मागील बाजूस एक समर्पित 3-इन-1 लाईट सेन्सर आहे. सेल्फी प्रेमींसाठी, यात 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो.
या फोनमध्ये मोटोरोलाचे खास मोटो AI फीचर्स देखील दिसतात, ज्यामध्ये फोटो एन्हांसमेंट, अॅडॉप्टिव्ह स्टेबिलायझेशन, मॅजिक इरेजर आणि बरेच काही उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, हा स्मार्टफोन मोटो जेश्चरसह गुगलच्या सर्कल टू सर्च आणि मोटो सिक्योर 3.0, स्मार्ट कनेक्ट 2.0, फॅमिली स्पेस 3.0 ला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, यात 5G, 4G LTE, , ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4 यासह अनेक पर्याय आहेत.