जिओ, एअरटेलसारख्या प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. त्यानंतर आता युजर्सची अनुभव आणखीन सुलभ करण्यासाठी बीएसएनएलने देखील आपल्या सर्व्हिस वेगवान करण्याचा निर्णय घेतला. लवकरच बीएसएनएल आपली 5G सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे. त्यांनतर आता बीएसएनएलदेखील किमती वाढवणार का असा प्रश्न ऐरणीवर होता.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा कोणताही हेतू नसल्याचे आता स्पष्ट केले आहे. असे मानले जात होते की 4G आणि 5G च्या रोलआउटनंतर, BSNL रिचार्ज प्लॅन महाग होऊ शकतात. परंतु बीएसएनएलचे अध्यक्ष आणि एमडी रॉबर्ट रवी यांनी मंगळवारी सांगितले की, कंपनीचा दर वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या BSNL सर्वात कमी किमतीत कॉलिंग आणि इंटरनेट सर्व्हिस देत आहे. तथापि बीएसएनएलची 3G सेवा उपस्थित आहे.
हेदेखील वाचा – Scams करणारे नंबर आले समोर, चुकूनही कॉल उचलू नका नाहीतर बँक अकाउंट होईल खाली
दरात कोणतीही वाढ होणार नाही
बीएसएनएलचे अध्यक्ष आणि एमडी रॉबर्टने नजीकच्या भविष्यात फी वाढीची गरज भासत नसल्याचे सांगितले. बीएसएनएलचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारतातील रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या खासगी कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे.
हेदेखील वाचा – Elon Musk हिंदी जाणकारांना देत आहे नोकऱ्या, ऑफिसलाही जावं लागणार नाही, xAI’मध्ये रिक्त जागा
लवकरच लाँच होणार 5G सर्व्हिस
बीएसएनएल लवकरच भारतात 5G सर्व्हिस सुरू करणार आहे. कंपनीने 5G ची यशस्वी चाचणी केली आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, 2025 च्या मध्यापर्यंत देशभरात 1,00,000 BSNL 4G साइट्स लाइव्ह केल्या जातील. यानंतर ते 5G कनेक्टिव्हिटीवर शिफ्ट केले जाईल. मंत्र्यांवर विश्वास ठेवला तर बीएसएनएलमध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडचे युग सुरूच राहणार आहे.