(फोटो सौजन्य - iStock)
सध्या कुठेही प्रवास करायचा असेल तर मेट्रो हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. प्रवासासाठी मेट्रोला लोक अधिक पसंत देतात. पण मेट्रोचे तिकीट खरेदी करण्यासाठी लोकांच्या लांबच रांग लागलेल्या असतात. मेट्रोने प्रवास करण्यापेक्षा तिकीट खेरदी करण्यासाठी रांगेत उभे राहणे अधिक त्रासदायक ठरते. तिकीट खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहिल्याने अनेकवेळा आपल्याला पुढील ठिकणी पोहोचण्यासाठी उशीर होतो. तुम्हाला देखील मेट्रोने प्रवास करताना तिकीट खरेदी करण्याच्या रांगेत उभे राहण्यासाठी कंटाळा येतो का? पण आता मेट्रोचे तिकीट खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची चिंता मिटली. मेट्रोने त्यांच्या प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध केली आहे. याव्दारे तुम्ही घरबसल्या व्हॉट्सॲपद्वारे मेट्रोची तिकीट खरेदी करू शकता. मेट्रोने सुरु केलेल्या या नव्या सुविधेमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
मेट्रोने दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे शहरांमध्ये यापूर्वीच व्हॉट्सॲपद्वारे मेट्रोची तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता नागपूरमध्ये देखील मेट्रोने प्रवाशांसाठी व्हॉट्सॲपद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मेट्रोच्या या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही सोप्या प्रक्रियेद्वारे प्रवासी घरबसल्या व्हॉट्सॲपद्वारे मेट्रोची तिकीट खरेदी करू शकतात. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शहरातील मेट्रोने दिलेल्या नंबरवर ‘HI’ लिहून मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ट्रेनमध्ये कुठे चढायचे आणि कुठे जायचे याची माहिती द्यावी लागेल आणि पेमेंटची पद्धत निवडावी लागेल. यामध्ये पेमेंट करण्यासाठी यूपीआय, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारखे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी आणि तेलुगू या भाषांचा समावेश आहे.
दिल्ली मेट्रोने व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी ९६५०८५५८०० हा नंबर दिला आहे. तर बंगळुरू मेट्रोने ८१०५५५६६७७ आणि हैदराबाद मेट्रोने ८३४११४६४६८ हा नंबर जारी केला आहे. ८३०००८६००० या नंबरद्वारे चेन्नई मेट्रोची तिकीट बुक करता येईल. पुणे मेट्रोने व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट बुक करण्यासाठी ९४२०१०१९९० आणि नागपूर मेट्रोने ८६२४८८८५६८ हा नंबर जारी केला आहे. तसेत तुम्ही Google Play Store वरील DMRC Travel App डाऊनलोड करून देखील मेट्रोची तिकीट खरेदी करू शकता.