OpenAI तयार करतेय नवीन AI डिव्हाईस, 2027 पर्यंत लाँच करण्याची योजना! असं असेल डिझाईन
सॅम ऑल्टमनच्या ओपनएआयने अॅपलचे माजी डिझायनर जॉनी आयव्ह यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) हार्डवेअर स्टार्टअप आयओचा ताबा घेतला. यानंतर दोन्ही कंपन्यांनी एक नवीन AI डिव्हाईस लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच याबाबत चर्चा देखील सुरु होती. मात्र आता या आगामी डिव्हाईसबाबत काही माहिती समोर आली आहे. हे आगामी डिव्हाईस कसं दिसेल, त्याची डिझाईन कशी असणार याबाबत अपडेट्स समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी डिव्हाईस प्रोटोटाइप टप्प्यात आहे. आगामी डिव्हाईसचा आकार ह्युमनच्या अयशस्वी झालेल्या Ai Pin पेक्षा थोडा मोठा आहे. मात्र हे डिव्हाईस iPod Shuffle सारखे आकर्षक असू शकते. डिव्हाईसचे मास प्रोडक्शन 2027 मध्ये सुरु होणार आहे. या डिव्हाईसचे असेंबली आणि शिपिंग चीनच्या बाहेर केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत TF Securities International एनालिस्ट Ming-Chi Kuo ने सांगितलं आहे की, Jony Ive आणि OpenAI चे नवीन AI डिवाइस सध्या प्रोटोटाइप टप्प्यात आहे. हे डिव्हाईस Humane च्या Ai Pin, एक कॉन्टेक्स्टुअल कंप्यूटर आणि वियरेबल डिव्हाईसपेक्षा थोडं मोठं आहे. सध्या हे डिव्हाईस प्रोटोटाइप टप्प्यात आहे. त्यामुळे आगामी काळात या डिव्हाईसचे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स बदलण्याची शक्यता आहे.
WSJ on Jony Ive and Sam Altman’s OpenAI device:
• The product will be capable of being fully aware of a user’s surroundings and life, will be unobtrusive, able to rest in one’s pocket or on one’s desk, and will be a third core device a person would put on a desk after a MacBook… pic.twitter.com/96q3YtM7Mu
— Ben Geskin (@BenGeskin) May 22, 2025
AI डिव्हाईसमध्ये एनवायरमेंटल डिटेक्शनसाठी कॅमेरा आणि मायक्रोफोन दिला जाण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस जेव्हा युजर्स गळ्यात घालतील तेव्हा या कॅमेरा आणि मायक्रोफोनचा उपयोग होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी डिव्हाईसमध्ये डिस्प्ले फीचर दिलं जाणार नाही. मात्र हे डिव्हाईस स्मार्टफोन आणि PC सोबत कनेक्ट केलं जाऊ शकतं.
Kuo ने म्हटलं आहे की, Jony Ive चे io आणि OpenAI 2027 मध्ये आगामी AI डिव्हाईसचे मास प्रोडक्शन सुरु करणार आहे. जियोपॉलिटिकल चॅलेंजेस आणि चीन-अमेरिका यांच्यातील टेरिफ वॉरमुळे या डिव्हाईसचे असेंबली आणि शिपिंग चीनच्या बाहेर केले जाऊ शकते. व्हिएतनाम हे त्याच्या असेंब्लीसाठी एक संभाव्य ठिकाण आहे. OpenAI चे CEO Sam Altman ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या आगामी डिव्हाईसची झलक दाखवली असल्याचं सांगितलं जात आहे. हे डिव्हाईस युजरच्या पॉकेट किंवा डेस्कवर देखील ठेवलं जाऊ शकतं.