सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 पर्यटक बुडाले (फोटो- istockphoto)
शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले
समुद्रात बुडून 3 जणांचा मृत्यू
एका पर्यटकाचा शोध सुरू
Tourist Drowned: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर चार पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. तर एका पर्यटकाचा शोध सुरू आहे. दरम्यान बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
शिरोडा वेळागर समुद्र किनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो. या ठिकाणी काही पर्यटक फिरण्यासाठी गेले होते. एकूण 8 पर्यटक शिरोडा वेळागर समुद्रात बुडाले आहेत. 8 पैकी 4 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका पर्यटकाचा शोध सुरू आहे. बुडालेल्या पर्यटकांमध्ये काही पर्यटक बेळगावचे आणि काही सिंधुदुर्गचे असल्याचे समोर आले आहे.
ज्या पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे त्यांना शिरोडा येथील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. एका पर्यटकाचा शोध अत्यंत वेगाने घेतला जात आहे. मात्र काळोख पडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.