eSIM कनेक्टिविटीसह Huawei च्या नवीन स्मार्टवॉचची एंट्री, प्रिमियम डिझाईन आणि क्लासी लूकने सुसज्ज! असे आहेत खास स्पेसिफिकेशन्स
टेक कंपनी Huawei ने नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे. हे नवीन स्मार्टवॉच Huawei Watch 5 या नावाने लाँच करण्यात आलं आहे. नवीन स्मार्टवॉच UK आणि निवडक यूरोपीय मार्केट्समध्ये लाँच करण्यात आलं आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे गॅझेट तुमच्यासाठी बेस्ट आहे. या स्मार्टवॉचसोबत कंपनीने Watch Fit 4 आणि Watch Fit 4 Pro देखील लाँच केले आहेत.
Huawei Watch 5 42mm आणि 46mm व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 5ATM आणि IP69 रेटिंग्स आहे आणि हे साडेचार दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते. स्मार्टवॉच Bluetooth कॉलिंग आणि eSIM कनेक्टिविटीला सपोर्ट करते. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन गॅझेट्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Huawei Watch 5 ची किंमत UK मध्ये 42mm ग्रीन आणि व्हाइट कलर ऑप्शनसाठी GBP 399.99 म्हणजेच सुमारे 45,700 रुपये आहे. 46mm Black ऑप्शनसाठी देखील हीच किंमत ठेवण्यात आली आहे. Huawei Watch Fit 4 व्हेरिअंटची किंमत GBP 149.99 म्हणजेच सुमारे 17,100 रुपये आणि Watch Fit 4 Pro व्हेरिअंट्सची किंमत GBP 249.99 म्हणजेच सुमारे 28,500 रुपये आहे.
Experience the future at #HuaweiLaunch in Berlin, with interactive #HUAWEIWatch5 experiences and the unveiling of the wholly reimagined all-new #HUAWEIWatchFIT4 series with invigorating Active Rings. #FashionNext pic.twitter.com/mOGkOLyxQ4
— Huawei Mobile (@HuaweiMobile) May 15, 2025
Huawei Watch 5 चे 42mm व्हेरिअंट बेज, ग्रीन, गोल्ड, आणि White शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर 46mm व्हेरिअंट ब्लॅक, ब्राउन, पर्पल, आणि टाइटेनियम कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. बेस Huawei Watch Fit 4 ला ब्लॅक, ग्रे, पर्पल आणि व्हाइट शेड्समध्ये लाँच करण्यात आलं आहे. Watch Fit 4 Pro गॅझेट ब्लऍक, ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
42mm Huawei Watch 5 मध्ये 1.38-इंच LTPO AMOLED डिस्प्ले आहे, तर 46mm व्हेरिअंटमध्ये 1.5-इंच स्क्रीन आहे. स्क्रीन 466 x 466 पिक्सेल रेजोल्यूशन आणि 3,000 nits पीक ब्राइटनेस लेवल ऑफर करते. मोठं मॉडेल एयरोस्पेस-ग्रेड टाइटेनियमपासून तयार करण्यात आलं आहे तर छोटा मॉडेल 904L स्टेनलेस स्टील बॉडीसह लाँच करण्यात आलं आहे.
Huawei Watch 5 मध्ये ECG, स्लीप, ब्लड ऑक्सीजन लेवल आणि हार्ट रेट मॉनिटर आहे. यामध्ये 5 ATM वॉटर रेजिस्टेंस आणि IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस रेटिंग आहे. स्मार्टवॉच Bluetooth 5.2, NFC, GPS आणि eSIM कनेक्टिविटी सपोर्ट करते. 42mm Watch 5 स्टँडर्ड मोडमध्ये तीन दिवस किंवा ऑलवेज-ऑन डिस्प्ले (AOD) मोडमध्ये दोन दिवस चालते. 46mm व्हेरिअंट स्टँडर्ड मोडमध्ये साडेचार दिवस आणि AOD मोडमध्ये तीन दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते.