तुम्ही AI च्या मदतीने कोणत्याही प्रकारचा व्हिडीओ अगदी सहज तयार करू शकता. टेस्ला आणि SpaceX चे सीईओ आणि ट्विटरचे मालक Elon Musk यांच्या X अकाऊंटवर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जागतिक नेते कॅटवॉकवर चालताना दिसत आहेत. ही क्लिप केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे.
फोटो सौजन्य- Elon Musk (X)
या व्हर्च्युअल व्हिडिओमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुरंगी ड्रेस परिधान केला आहे. त्यांचा पोशाख ईशान्य भारताच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो. तर दुसऱ्या फोटोमध्ये मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स आहेत. काही दिवसांपूर्वी जगभरात मायक्रोसॉफ्ट क्रॅश झाले होते. तेव्हा प्रत्येकाच्या लॅपटॉपवर जी निळ्या रंगाची स्क्रीन दिसत होती. ती बिल गेट्सच्या हातात आहे.
व्हिडिओची सुरुवात पोप फ्रान्सिस यांनी केली आहे. त्यांनी हिवाळ्याच्या हंगामाप्रमाणे पांढरे पफर जॅकेट परिधान केलं आहे. त्यांनी कमरेला सोन्याचा पट्टा घातला आहे. याशिवाय रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी लुई व्हिटॉन कंपनीचा इंद्रधनुष्याचा पोशाख परिधान केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कैद्यांच्या केशरी पोशाखात दिसत आहेत. ट्रम्प यांच्या दोन्ही हातात हातकड्य लटकल्या आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन देखील बॅगी लाँग हुडी आणि सोन्याचा नेकलेस घालून रॅम्पवर चमकताना दिसत आहे. त्याने डोळ्यांना चष्मा लावला आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लाल, निळा आणि पिवळा अशा तीन रंगाचा पोशाख परिधान केला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी राष्ट्रध्वज असलेला ड्रेस परिधान केला आहे.
Elon Musk ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये mark zuckerberg अतिशय वेगळ्या अवतारात दिसत आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वेगवेगळ्या पोशाखांमध्ये सादर करण्यात आले आहे. ज्यामध्ये ते फॅशन फ्रीक आणि बास्केटबॉल खेळाडू, आणि योद्धा म्हणून दिसत आहेत.