घराघरात वापरला जाणारा यूट्यूब हा ऍप सर्वांच्या आयुष्याचा एक भाग आहे. यूट्यूबवर यूजर्स आपले आवडते चित्रपट पाहू शकतात, गाणी ऐकू शकतात, एवढेच नाही तर इथून पैसेही कमवू शकतात. मात्र सततच्या वापरामुळे आपला डेटा लवकर संपू लागतो आणि काही वेळाने आपल्याला आपले आवडते व्हिडिओज पाहता येत नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का? तुम्ही यूट्यूबवर तुमचे आवडते व्हिडीओज इंटरनेटशिवाय देखील पाहू शकता. यूट्यूबच्या फीचरनुसार तुम्ही तुमचे आवडतो व्हिडिओज कधीही आणि कुठेही इंटरनेट नसतानाही पाहून शकता, ते कसे जाणून घेऊयात.
कसे पाहू शकते ऑफलाईन व्हिडिओज
यूट्यूब आपल्याला ऑफलाईन व्हिडिओज सेव्ह करण्याची संधी देत असतो. याचाच अर्थ जेव्हाही तुम्ही इंटरनेटच्या रेंजमध्ये असाल, तेव्हा तुम्ही तुमच्या फोनवर तुमचे आवडते व्हिडिओज डाउनलोड करून ठेवू शकता आणि नंतर तो व्हिडिओ कधीही प्ले करू शकता. यामुळे तुमचा इंटरनेट डेटा संपणार नाही. तसेच, तुम्ही इंटरनेट नसलेल्या भागात YouTube व्हिडिओ प्ले करण्यास सक्षम असाल. अनेक भारतीय लोक रोज फक्त निवडक गाणी वारंवार ऐकत असतात , असे साधारणपणे दिसून येते. अशा यूजर्ससाठी, यूट्यूब व्हिडिओ ऑफलाइन प्ले करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
[read_also content=”POCO चा नवा फोन, पावरफुल बॅटरीसह अगदी कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध https://www.navarashtra.com/technology/pocos-new-phone-with-a-powerful-battery-is-available-on-sale-at-a-very-low-price-539788.html”]
यूट्यूब व्हिडिओज ऑफलाईन प्ले कसे करायचे?






