फ्लिपकार्ट ही भारतातील अग्रणीय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. इथे तुम्ही ऑनलाईन अनेक मूलभूत वस्तू विकत घेऊ शकता. कॉस्मॅटिकपासून ते घरगुती आणि इलेक्ट्रॉनिक सामानापर्यंत इथे तुम्हाला अनेक गोष्टी अगदी वाजवी दरात खरेदीसाठी मिळतील. दिवाळी, नाताळसारख्या सणांदिवशी फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या जातात. मात्र सध्या कोणताही सण नसतानाही फ्लिपकार्टवर ग्रहकांसाठी विशेष सेल सुरु आहे. या सेलचे नाव आहे Flipkart Big End of Season Sale. या सेलमध्ये गॅजेट, स्मार्टफोन्सपासून ते फॅशन प्रोडक्टसपर्यंत अनेक गोष्टींवर चांगलेच डिस्काउंट देण्यात येत आहे.
फ्लिपकार्ट डील्सनुसार, या सेलदरम्यान ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना आता 80 टक्क्यांपर्यंतच्या सूटचा फायदा घेता येणार आहे. smart gadget आणि Accessoriesवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंतची सूट तर स्मार्टफोन्सवरही 80 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. या सेलदरम्यान ग्राहकांना इन्स्टंट 10 टाक्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.मात्र यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्ट युपीआयचा वापर करावा लागणार आहे आणि यासाठी काही अटी आणि नियम लागू केले जाणार आहेत.
[read_also content=”उन्हाळयात ओव्हरहिट होत आहे मोबाईल? मग या ट्रिक्स येतील कामी , जाणून घ्या https://www.navarashtra.com/technology/mobile-overheating-in-summer-then-follow-these-tricks-541568.html”]
स्मार्टफोन्सवर मिळतोय डिस्काउंट
फ्लिपकार्ट सेलदरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन्सवर भरगोस डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये तुम्हाला अनेक कंपनीचे लेटेस्ट फोनवरही डिस्काउंट देण्यात येत आहे. यात iPhone आणि Andriod दोन्हींचा समावेश आहे. यादरम्यान रेडमी, सॅमसंगसह अनेक अनेक ब्रॅंड्सचे मोबाईल आता ग्राहकांना वाजवी दारात विकत घेता येणार आहेत.
ब्रँडेड शूज आणि कपड्यांवर सूट
या सेलदरम्यान, घड्याळासारख्या वस्तूंवरही विशेष डिस्काउंट देण्यात येत आहे. कंपनीचा दावा आहे की, अनेक कपड्यांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. इतकेच नव्हे तर Pume Shoes वरही किमान 50 टाक्यांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. ग्राहक या सर्व ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात.