Raigad News: रोहा-तांबडी रस्त्याची दयनीय अवस्था! निवडणुकीच्या तोंडावरही प्रशासनचे दुर्लक्ष, प्रवासी-ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप
कोल्हापूरच्या शहापुरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; चहा करण्यासाठी गॅस पेटवला अन्…
या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, कष्टकरी शेतकरी, कामगार वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक लालपरीसह खासगी वाहनांतून नियमित प्रवास करतात. मात्र रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की दैनंदिन प्रवास नाहक त्रासदायक ठरत आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाही या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची साधी मलमपट्टीदेखील करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुनेश्वर जिल्हा परिषद व धाटाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील निवी ठाकरवाडी, वाशी ग्रामपंचायत हद्दीतील कारिवणे व धनगरवाडी, वाली ग्रामपंचायत हद्दीतील बारशेत, मुळगाव, चिचोटी, जाधववाडी, गौळवाडी, सवाने तसेच तांबडी ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी बुद्रुक, ताम्हणशेत, शेठ बुद्रुक व खुर्द अशा अनेक गावांचा या मार्गात समावेश होतो. या सर्व वाड्या-वस्त्यांमधून सुमारे अडीच ते तीन हजार मतदार आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
निवडणुकीच्या काळात राजकीय नेते केवळ मतांची मागणी करण्यासाठी येतात, मात्र नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व रस्त्याची दयनीय अवस्था पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे यावेळी रस्ता नसेल तर मत नाही’ अशी ठाम भूमिका मतदार राजा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचा थेट परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होण्याची चर्चा परिसरात रंगली आहे. दरम्यान, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो खड्डेमुक्त व सुरक्षित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्ग व स्थानिक नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात येत आहे.
या रस्त्यालगत तांबडी बुद्रुक, निवी ठाकरवाडी, सवाने, बारशेत गौळवाडी, म्हासाडी, वाली आणि कारिवणे ही गावे येतात. या गावांतील नागरिकांना रोहा बाजारपेठ, शासकीय कार्यालये, दवाखाने व इतर कामांसाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली आहे की नाही, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या रस्त्याचे टेंडर मंजूर झाले आहे. मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने काम सुरू करता येत नाही. आचारसंहितेला शिथिलता मिळताच तातडीने काम सुरू करण्यात येईल, सध्या चार किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचे नियोजन आहे.- विजय बागुल, उपअभियंता, सा.बा.वि., रोहा






