Free Fire Max: फ्री फायर मॅक्समध्ये तुम्हीही जिंकू शकता जास्तीत जास्त रँक मॅच, केवळ फॉलो करा या 3 स्टेप्स
रँक मोडमध्ये जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Close Range च्या फाइट्सपासून स्वत:चा बचाव करणं. यासाठी तुम्हाला लांब आणि मध्यम रेंजच्या लढाईवर लक्ष द्यावं लागणार आहे. यासाठी स्नाइपर किंवा डीएमआर सारख्या गनचा वापर केला जाऊ शकतो. या गनचा वापर केल्याने धोका कमी होतो, ज्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहू शकता.
अनेक प्लेअर्सचं रँक मोडमध्ये न जाण्याचं कारणं म्हणजेच ते सेफ झोनवर लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्लेअर्सनी नेहमी सेफ मोड जवळ राहणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला जास्त फिरावं लागणार नाही. यासोबतच, झोनमध्ये कोसळण्याची शक्यता देखील कमी होईल. सुरक्षित झोनमध्ये राहिल्यानंतर, तुम्ही लवकर पुढे जाऊ शकाल आणि शेवटच्या झोनमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचू शकाल.
अनुभव प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत, फ्री फायर मॅक्स गेम खेळणाऱ्या लोकांसाठी अनुभव खूप महत्त्वाचा आहे. यासाठी, तुम्ही अशा लोकांना फॉलो केले पाहिजे जे आधीच खूप अनुभवी आहेत. अशा प्रकारे, तुम्हाला तुमच्या सामन्यात खूप सुधारणा दिसेल.






